दिल्ली| ललित कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्रातील चार कलाकारांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
61 व्या राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कारासाठी देशभरातून 5 हजार कलाकारांचे अर्ज प्राप्त झाले होते. यातील 15 सर्वोत्कृष्ट कलाकारांची निवड करून त्यांना आजच्या समारंभात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार कलाकारांना यावेळी गौरविण्यात आले. 2 लाख रूपये, सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे.
सोलापूर येथील तेजस्विनी सोनवणे आणि मुंबई येथील सागर कांबळे, रतनकृष्ण साहा, दिनेश पांडया यांना यावेळी राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात आज 61 व्या राष्ट्रीय ललितकला अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल, मंत्रालयाचे सचिव योगेंद्र त्रिपाठी आणि ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यावेळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-रानू मंडलचे दिवस सरले… पुन्हा नशिबी आले ‘पुराने दिन’!
रानू मंडलचे दिवस सरले… पुन्हा नशिबी आले ‘पुराने दिन’!
-मोदी पुढे… अमृता फडणवीस मागे; टाकलं पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल!
-पुढची 5-10 वर्ष अशीच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तकं लिहित राहा; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना चिमटा
-विरोधी पक्षनेते म्हणून तुमचं काम अधिक खुलतं… अशीच पुस्तकं लिहीत रहा; पटोलेंची फटकेबाजी