अमित शहांच्या तब्येतीविषयी अफवा पसरवणाऱ्या चौघांना गुजरातमध्ये अटक

गांधीनगर | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तब्येतीविषयी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या चौघांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. दोन व्यक्तींना भावनगर तर दोन व्यक्तींना अहमदाबादमधून अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

सोशल मीडियावर अमित शहा यांच्या तब्येतीविषयी गेल्या काही दिवसांत चुकीची माहिती पसरवण्यात येत होती. अखेरीस अमित शहा यांनी स्वतः स्पष्टीकरण देत आपली तब्येत ठणठणीत असल्याचं जाहीर केलं.

मागील काही दिवसांपासून काही मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या आरोग्यासंदर्भात वाटेल त्या अफवा पसरवल्या. काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्विट करुन प्रार्थनाही केली, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

देश सध्या कोरोनासारख्या जागतिक महारोगाशी लढा देत आहे. देशाचा गृहमंत्री म्हणून मी रात्रंदिवस माझ्या कामात व्यस्त असल्याने मी या गोष्टींकडे फारसे लक्ष दिलं नाही. जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली तेव्हा मी विचार केला की हे सर्व लोक त्यांच्या काल्पनिक जगात जगत आहेत. त्यामुळेच मी कोणतेही स्पष्टीकरण दिलं नाही, असं अमित शहा म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज- आयुक्त शेखर गायकवाड

-दिग्गजांना बाजूला सारत विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ युवा नेत्याला संधी

-…म्हणून साई पल्लवीने धुडकावलं 2 कोटी रुपयांचं मानधन

-कौतुकास्पद! शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला महिन्याभराचा पगार

-केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार, कामगारांना पायी जाण्यापासून रोखा- देवेंद्र फडणवीस