मोटारीवर कव्हर, आत प्रेमीयुगूलाचे चाळे; आजीबाईंच्या एका शंकेनं बिंग फुटलं!

पुणे : आजची तरुण पिढी प्रेमासाठी काय करेल काही सांगता येत नाही. पुण्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. चारचाकी गाडीवर कव्हर टाकून गाडीत अश्लिल चाळे करणाऱ्या एक प्रेमी युगुल बिंग एका आजीबाईंनी फोडलं. 

परमहंसनगरजवळ मिलिट्री गेटजवळ एका गाडीवर कव्हर टाकले होते. गाडीत चालू असलेल्या एसीचा आवाज आजींनी ऐकला आणि प्रेमींचं बिंग फुटलं. 

एसीचा आवाज ऐकून जवळच्या आजीबाईंना शंका आली की गाडीत कोणी अडकलं की काय…? म्हणून त्यांनी गाडीमालकाबाबत चौकशी केली. सोसायटीच्या अध्यक्ष आसपासच्या रहिवाश्यांकडे आजींनी चौकशी केली.  

आपल्याकडे कोणाही पाहुणे आले नाहीत, असं सगळ्या रहिवाश्यांनी सांगितलं. नंतर शंका आली ती गाडीत चुकून एसी चालू राहिला असेल याची.

सोसायटीच्या अध्यक्षांनी गाडीवरील कव्हर हटवताच समोर आलेलं सत्य पाहून सर्वजण चांगलेच आचंबित झाले. गाडीत एक प्रमी युगुल अश्लिल चाळे करताना त्यांना दिसले. 

संबंधित प्रेमी युगुलाला रहिवाश्यांनी फटकारलं आणि तिथून हाकलून लावलं. याबाबत रहिवाश्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र पोलिसांनी अशा घटनांवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी परिसरातील रहिवाश्यांची अपेक्षा आहे. 

परमहंसनगरजवळील रस्ता मोठा असल्याने त्या भागात पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. पार्क केलेल्या गाड्यांचा आमच्याशी काहीही संबंध नाही. त्यांना पार्किंगपासून कसं रोखावं हा प्रश्न आता आम्हाला पडला आहे, असं सोसायटीतील लोकांचं म्हणणं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-आई नको म्हणत होती…. मित्र आले अन् घेऊन गेले… पण आता तो कधीच परत येणार नाही!

जागावाटपाबद्दल चंद्रकांत पाटलांनी बोलू नये- संजय राऊत

-…अन् पिडितांना भेटण्यासाठी प्रियांका गांधींनी अख्खी रात्र जागून काढली!

-आम्ही दोघी संसदेत का हसलो???, अखेर रक्षा खडसेंनी सांगितलं कारण

-युतीत बंडखोरीची शक्यता; परभणीत भाजपला हव्यात शिवसेनेच्या जागा