औरंगाबाद महाराष्ट्र

“चित्रा वाघ यांनी पक्षात राहून पक्षाचं नुकसान केलं; आम्हीच हकालपट्टी करणार होतो”

परभणी |  चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा फौजिया खान यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी पक्षात राहूनही पक्षाचं काम न करता पक्षाचं नुकसानच केलं. आम्हीच त्यांची हकालपट्टी करणार होतो, अशी टीका फौजिया खान यांनी केली आहे.

चित्रा वाघ यांच्यासंबंधी गेल्या वर्षभरापासून तक्रारी येत होत्या. आम्हीच त्यांच्याशी बोलणार होतो आणि त्यांची हकालपट्टी करणार होतो, असं खान म्हणाल्या आहेत.

चित्रा वाघ यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसने लगोलग महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चाकणकर यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली.

दरम्यान, चित्रा वाघ या राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जायच्या. महिलांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भाषणांसाठी आणि मांडणीसाठी त्या प्रसिद्ध होत्या. सत्ताधारी भाजपवर त्या कडाडून हल्लाबोल करायच्या. परंतू त्यांनी राष्ट्रवादीचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चित्रा वाघ आणि सचिन अहिर यांच्या राजीनाम्यावर मेहबूब शेख यांची आक्रमक प्रतिक्रिया!

-‘होय, मी शरद पवार साहेबांच्या सोबत आहे…; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर मोहीम

-या 20 दिग्गज नेत्यांनी पवारांची साथ सोडली तर हे 9 जण धक्का देण्याच्या तयारीत!

-महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड

-काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते म्हणतात वंचितबरोबर चर्चा सुरू; प्रकाश आंबेडकर म्हणतात…

IMPIMP