AAP आणि BJP नगरसेवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

नवी दिल्ली | The Kashmir Files हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाबद्दल काही संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची आणखीनच चर्चा होताना दिसतीये.

भाजप या कश्मीर फाईल्स चित्रपटावरून राजकारण होत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. कश्मीर फाईल्स ला टॅक्स फ्री करावा या मागणीवरून केजरीवालांनी भाजपचे कान टोचले होते.

कश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करण्याऐवजी यु ट्यूबला टाका, सर्वकाही फ्री होईल, असं केजरीवाल म्हणाले होते. त्यावरून राजकारण पेटल्याचं पहायला मिळतंय.

केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने काश्मिरी पंडितांची खिल्ली उडवली. त्याबद्दल आप नेत्यांनी आणि नगरसेवकांनी माफी मागावी, असा निषेध ठराव भाजप नगरसेवकांनी मांडला होता. त्यानंतर मुद्दा आणखी पेटला.

याच ठरावावरून भाजप आणि आपच्या नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी पहायला मिळाली. पूर्व दिल्ली महापालिकेत बैठकीवेळी ही घटना घडली. सध्या देशात याचीच चर्चा होताना दिसत आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायपरल होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या – 

झटपट वजन कमी करायचंय? मग अंड्यांसोबत आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

“2 वर्षात तब्बल 19 लाख EVM गायब”, शशी थरूर यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

 Russia-Ukrain War: “युक्रेनला सांगा मी त्यांना पुर्णपणे बर्बाद करेन”; पुतिनच्या धमकीनं जग हादरलं

  मास्कमुक्तीच्या निर्णयाविषयी राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

  नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात