“राज्यपालांना वारंवार भेटणं म्हणजे राज्यात…”, एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा

जळगाव | राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रपती राजवट संदर्भात चर्चा होत आहे. विरोधकांकडून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली आहे.

राज्यात सत्ता नसल्यामुळे भाजपचे नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ते आदळआपट करत आहेत. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही, अशा बोंबा ते मारत आहेत, अशी बोचरी टीका एकनाथ खडसेंनी केली आहे.

एक तर महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळेच भोंगे आणि हनुमान चालीसाचे मुद्दे काढून विरोधकांकडून लक्ष विचलित करण्याचे काम सुरू आहे. विरोधकांकडून राज्यात वारंवार अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा हल्लाबोल एकनाथ खडसेंनी केला आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा बोंबा ठोकायच्या आणि राज्यपालांना भेटायचे हेचं काम विरोधकांना उरले आहे, असा खोचक टोला एकनाथ खडसेंनी लगावला आहे.

महागाईने राज्यात उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य माणूस बेरोजगार झाला आहे. विरोधकांनी केंद्र सरकारकडे महागाईतून दिलासा कसा मिळेल यासाठी मागणी करावी, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचे षडयंत्र सुरु असून ते कधीही यशस्वी होणार नाही, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारची भूमिका गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विषयी कठोर आहे. शासनाचे काम गुन्हेगारांना वचक बसविण्यासाठीचं आहे, असंही एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, शासनाचे काम हे गुन्हेगारांना वचक बसविण्यासाठीचं आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यात मास्क सक्ती होणार?, आरोग्यमंत्री राजेश टोपे स्पष्टच म्हणाले…

हनिमूनला असं काही घडलं की नवरदेवाला घामच फुटला; बेडवर बसलेल्या नवरीचा पदर उचलला अन्…

रिलायन्स इंडस्ट्रीजची ऐतिहासिक वाटचाल; शेअर्स विक्रमी स्तरावर, देशातील पहिली कंपनी बनली

हाय रे गर्मी! देशातील 5 राज्यांना तीव्र उष्णतेचा इशारा; वाचा हवामान खात्याचा अंदाज

राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढणार, शिवसेना व्हिडीओ बाॅम्ब फोडणार; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा