मुंबई| सोशल मीडियाचा वापर करणं जेवढं सोईस्कर आहे तेवढंच वाईटही. चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टींनाही सामोरं जावं लागतं. काही व्यक्ती समोरच्या व्यक्तीला न भेटता, फक्त फेसबुकच्या चॅटिंगवरून जेव्हा फ.सवणुकीला ब.ळी पडतात तेव्हा सोशल मीडियाची दुसरी काळी बाजू उघडकीस येते. यातच सोशल मीडियावर फ.सवणूक करण्याचं प्रमाणं वाढत चाललं आहे.
अशात आता जोधपूरचा एक व्यक्ती ऑनलाईन फ.सवणुकीला ब.ळी पडला आहे. या प्रकरणात त्याला त.ब्बल 10 लाखाचा गं.डा बसला आहे. जोधपूर येथील संजय काॅलनी येथे राहत असलेल्या एका सेवानिवृत्त सैनिकासोबत हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहेे.
जोधपूरच्या संजय कॉलनीमधील रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त सैनिक खिवसिंहची काही दिवसांपूर्वी फेसबुकवरील प्रियंका कुमार नावाच्या एका महिलेसोबत मैत्री झाली. बोलता बोलता एक दिवस तिनं की, तिचे चुलते वाळू काम करतात. तिथे काम करताना त्यांना चमकणारा धातू सापडला. त्या धातूविषयी तपास केल्यावर जमजलं तो चमकणारा धातू सोनं आहे.
पुढे ती म्हणाली की, आम्हाला भिती वाटत आहे की हे सोनं आमच्याकडून कोणी घेऊन जाईल, चोरी होऊन जाईल. त्यामुळे हे सोनं तुम्ही घ्या. आम्ही तु्म्हाला हे सोनं कमी किमतीत देऊ.
प्रियंकाच्या बोलण्यानुसार खिवसिंह आसाममध्ये गेले. तिथे गेल्यावर प्रियंका त्यांना घ्यायला आली. प्रियंकानं तिच्या चुलत्याला खिवसिंहला भेटवलं. त्यांनी सोन्याच्या धातुचा एक तुकडा कापून खिवसिंह यांना दिला. खिवसिंह हा तुकडा घेऊन जोधपूर आला आणि सोनाराकडून याची तपासणी केली. तेव्हा त्याला समजलं की हे सोनंच आहे. यानंतर काही दिवसात प्रियंकाचा फोन आला आणि ती म्हणाली, की 2 किलो 300 ग्रॅम सोन्याचे चुलते 20 लाख मागत आहेत. मात्र, तुम्हाला 10 लाखात देईल.
यानंतर पुन्हा खिवसिंह आसाममध्ये गेले .तिथे त्यानं तो धातू 10 लाख रुपये देऊन खरेदी केला. या धातूची सोनाराकडे तपासणी केली असता हे सोनं नसल्याचं समोर आलं. यानंतर खिवसिंहनं प्रियंकाच्या सगळ्या नंबरवर फोन केला मात्र तिचा फोन बंद होता. यानंतर त्यांनी प्रतापनगर ठाण्यात आपल्यासोबत झालेल्या या फ.सवणुकीसाठी रिपोर्ट दाखल केला. याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे.
दरम्यान, सध्याच्या काळात सोशल मीडिया हा समाजाचा आरसा झाला आहे. आपल्या आयुष्यातील चांगल्या, वाईट गोष्टी आवर्जून फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्वीटर, इन्स्टाग्राम अशा विविध अॅप्सवर शेअर केल्या जात आहेत. या आभासी जगाची आता सर्वांना भु.रळ पडू लागली आहे. त्याला कोणीही अपवाद नाही. कुटुंब, शाळा, कॉलेज, पदवीचे शिक्षण, क्लासच्या ठिकाणी, नोकरी, जिम, बागांमध्ये असलेले ग्रुप, अशा एक ना अनेक ठिकाणी भेटलेल्या, जोडले गेलेल्या लोकांना सोशल मीडियाने आणखी जवळ आणले असले, तरी त्यातून होणारे बेबनाव, गैरवापर, त्रास देणे, बदनामी होणे, या त्रासाला अनेकांना सामोरे जावे लागते आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘या’ प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर ठाकरे सरकार पडेल – कंगना राणावत
सचिन वाझे यांच्या अ.टकेनंतर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
सोशल मिडीयावर सायली संजीवचा ‘हा’ सीन होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ
‘सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे’ – राम कदम
आज सोन्याच्या भावात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, पाहा काय आहेत भाव