मोठी बातमी: 1 मार्चपासून ‘या’ सर्वसामान्य लोकांना मिळणार मोफत कोरोना लस

देशात कोरोना विषाणू पून्हा मोठ्या संख्येनं वाढताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना लसीकरण दिलं जात आहे. यातच आता देशाभरात 16 जानेवारीपासून सुरु झालेलं कोरोना लसीकरण आता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत येऊन पोहोचलं आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यातच कोरोनावरील लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला पहायला मिळतोय.

आता शेवटी सर्वसामान्यांसाठीची कोरोना लसीकरणाची प्रतीक्षा संपली. आता त्यांनाही कोरोना लसीकरण दिलं जाणार आहे. देशात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनावरील लसीकरणाची घोषणा करताना प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, येत्या 1 मार्चपासून देशातील 60 वर्षांवरील नागरिकांना आणि गंभीर समस्यांनी ग्रस्त असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. देशभरातील 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांमधून हे लसीकरण केले जाईल. सरकारी केंद्रावरील लसीकरण हे पूर्णपणे मोफत असेल.

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून देशभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव गेल्या काही महिन्यात कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून देशातील काही राज्यांत कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू होणे हे दिलासा देणारे आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात रात्री संचार निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आले आहे.

पुणे शहरात आज गेल्या 24 तासांत तब्बल 743 करोनाबाधित रुग्ण आढळले असून, प्रशासनाने अधिक सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन केले नाही तर यवतमाळ, अमरावती आणि नागपूर शहरांप्रमाणे पुण्यातही लॉकडाऊन करण्याची वेळ येईल अशी स्थिती हळू हळू निर्माण होत आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

आणखी एका स्टारकिडचं कलाविश्वात पदार्पण, झळकणार ‘या’ भूमिकेत

मोठी बातमी! ‘त्या’ प्रकरणी एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा

….म्हणून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ – मुंबई महापालिका आयुक्त

आण्णा तुला गर्लफ्रेंड आहे का?, तरुणीच्या प्रश्नानी राहुल गांधी क्लिन बोर्ड

खुशखबर! सोनं तब्बल 16 टक्क्यांनी घसरलं; वाचा आजचे ताजे दर