देश

देशातील दिग्गज नेत्यांकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांच कौतुक

नवी दिल्ली : चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यास अवघा एक मिनिटं बाकी असताना भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटला. त्यामुळे सर्व शास्त्रज्ञ निराश झाले. पण देशभरातून प्रत्येक नागरीक तसेच दिग्गज मंडळींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांच कौतुक केलं आहे.

प्रत्येक भारतीयांसाठी ही एक मोठी प्रेरणा आहे. तुमचं काम आणि मेहनत ही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. तुमचं काम फुकट गेलं नाही, असं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

भारत तुम्हाला सलाम करतोय. तुमच्या कार्यावर आम्हाला गर्व आहे. आपल्या शास्त्रज्ञांना खूप शुभेच्छा, असं ट्वीट पियुष गोयल यांनी केलं आहे.

चांद्रायान 2 मोहिमेवर प्रत्येक भारतीय गर्व करत आहे. भारत आपल्या इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांच्यांसोबत आहे. भविष्याच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा, असं ट्वीट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे.

आम्हाला आमच्या वैज्ञानिकांवर गर्व आहे. त्यांनी इतिहास रचला आहे. निराश होण्याची गरज नाही. आपल्या वैज्ञानिकांनी मोठं काम केलं आहे, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटल आहे.

महत्वाच्या बातम्या-