भिवंडीमध्ये फर्निचर कारखान्यांना लागली आग, सहा तासांनंतर अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश

भिवंडी | आजकाल अनेक अपघात घडल्याच्या दुर्घटना घडल्या असल्याच्या बातम्या कानावर पडत आहेत. भिवंडी आणि आजूबाजूच्या परिसरात तर अशाप्रकारचे अपघात वारंवार घडतच असतात.

अशातच भिवंडी ठाणे रस्त्यावरील कशेळी चामुंडा कॉम्प्लेक्स येथील फर्निचर कारखान्यांना भिषण आग लागल्याची बातमी समोर येतं आहे. ही आग शुक्रवार 15 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास लागली असल्याची असल्याचं समजतं आहे.

या आगिमध्ये 50हून अधिक गोदाम आणि 5 कारखाने जळून खाक झाली आहेत. आग खूप लागली असल्यामुळे या कारखान्यांमधील सर्व लाकूड, कापूस, फोममुळे आग आणखिण वाढत गेली. आग जास्त असल्यामुळे ती आग विझवायला अग्निशामक दलाला तब्बल सहा तासांनंतर आग विझवण्यात यश आलं.

आग लागलेल्या त्याठिकाणी जवळपास पाण्याची सोय नसल्यामुळे लागलेली आग विझवता येत नव्हती. परंतू काही वेळानं पाणी उपलब्ध झाल्यानंतर आगीवर नियंत्रण आलं असल्याचं, अग्निशामक केंद्रातील अधिकारी हिंदुराव बोंडवे यांनी सांगितलं आहे.

तसेच लागलेल्या या आगीमुळे कोट्यावधीचा माल जळलाला गेला. मात्र सुदैवाने या भिषण आगीमध्ये एकही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर येतं आहे.

महत्वाच्या बातम्या-

आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये झाली वाढ

“आम्हाला उद्धवजींमध्ये राहूल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत”

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदूस्थान- संभाजी भिडे

दसऱ्याच्या मुहूर्तावर करा सोनं खरेदी, वाचा सोन्याचा आजचा दर

“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदलेल्या मेंढरासारखी झाली आहे”