मुंबई | राज्याचे मंत्री नवाब मलिक हे सध्या ईडीच्या अटकेत आहेत. अवैध मालमत्ता संबंधी मलिक यांच्या अडचणीत सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. परिणामी राज्य सरकारची डोकेदुखी देखील वाढत आहे.
मलिक यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तांमध्ये व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राज्यात मलिकांच्या अटकेनंतर राजकीय गोंधळ झाला होता.
भाजपनं मोठा दबाव आणून देखील महाविकास आघाडी सरकारमधून मलिकांचा राजीनामा घेण्यात आला नाही. परिणामी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता.
आज संपणारी मलिक यांची कोठडी आता पुन्हा चार दिवसांनी वाढवण्यात आली आहे. 22 एप्रिलपर्यंत मलिकांना न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे.
सध्या मलिक हे आर्थर रोड कारागृहात आहेत. मलिक यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मलिक यांच्या वकीलांनी जामीनाची मागणी केली होती
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयानं मलिकांच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मलिक यांच्या कोठडीत वाढ करण्यात आल्यानं मलिकांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.
मलिक यांच्याकडून आपल्यावरील सर्व गुन्हे रद्द करण्यात यावेत आणि आपल्याला बेकायदेशीररित्या अटक केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाद याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होणार आहे.
दरम्यान, मलिक यांच्या राज्यभरातील विविध मालमत्तांवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. मलिक यांच्या आत्तापर्यंत तब्बल 10 पेक्षा अधिक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
“जेम्स लेन 20 वर्षे कुठं गेला होता?, गाडलेला राक्षस बाहेर काढू नका”
“…तर हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म दिला पाहिजे”
मोठी बातमी! लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
“…म्हणून चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रात थांबावं”
रशियाची युक्रेनियन सैन्याला नवी ऑफर, म्हणाले…