पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी शक्ति प्रदर्शन करत तळोजा ते पुण्यापर्यंत काढलेल्या मिरवणूकीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कुख्यात गुंड गजानन मारणे दोन खुनांच्या खटल्यातून सुटल्यानंतर त्याची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत साधारण तीनशेच्या आसपास चारचाकींचा ताफा करत मारणे पुण्यात आला. याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांनी कोरोनाचे सर्व नियम धुडकावून लावून दिल्याचे समोर आले. त्यामुळे याप्रकरणी त्याची चौकशी होणार असल्याचं समजतंय.
गजानन मारणे कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी त्याची मिरवणूक काढली. मुंबईतील तळोजा कारागृहापासून तर पुण्यापर्यंत त्याची मिरवणूक काढण्यात आली. गजानन मारणे याची तळोजा कारागृहाच्या बाहेरुन मिरवणूक निघालीच कशी? याची चौकशी होणार आहे. त्याचबरोबर राज्याचे कारागृह महानिरिक्षक सुनील रामानंद यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
कोरोनाच्या परिस्थितीतही कोणत्याही नियमांचे पालन न करता गजानन मारणेनं मिरवणूक काढली. कोरोनाचे सर्व नियम धुडकावून लावूत मारणे आणि त्याच्या साथीदारांवर दह.शत पसरविल्यानं त्यांच्यावर पो.लिसांनी गु.न्हा दाखल केला आहे. फटाके फोडून तब्बल 300 वाहनांच्या ताफ्याचे ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने चित्रीकरण करत ही मिरवणूक काढण्यात आली होती. माध्यमांनी या गुन्हेगारीच्या उदात्तीकरणावर टीकेची झोड उठवताच पो.लिसांनी गजा मारणेवर गुन्हा दाखल करत अटकही करण्यात आली.
कोरोनाचे सर्व नियम धूडकावून लावल्यानं याप्रकरणी आता मारणे आणि त्याच्या साथीदारांवर दहशत पसरविल्याचा गुन्हा तळेगाव दाभाडे पाोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, त्यांना त्यावेळी कोणीही अडवलं नाही. हा ताफा पुढे निघून गेल्यावर पोलिसांनी एक्सप्रेसवेचे नियम मोडल्याबद्दल मारणे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंद केलाय. त्याचबरोबर अवैधरित्या उडवले जाणारे ड्रोन कॅमेरेही जप्त केले आहेत.
दरम्यान, शंभुराज देसाई यांनी गजाजन मारणे मिरवणूक प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं. मिरवणुकीच्या व्हिडीओ क्लिप तपासल्या जाणार आहेत. बेकायदेशीर पद्धतीनं जमाव जमवला असेल तर चौकशीअंती त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. जेलमधून सुटून आल्यानंतर गजानन मारणेवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘सुशांतचा वापर केवळ प्रसिद्धिसाठी केला’ ‘या’ फोटोंमुळे अंकिता सोशल मीडियावर होतेय ट्रोल
काय झालं साराला? हॉस्पिटलमधून व्हिडीओ शेअर करत केला खुलासा, म्हणाली…
मोठी बातमी! 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
बाबो! आज देखील सोन्याच्या दरात वाढ, वाचा किती रूपयांनी महागले सोनं