‘ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केलं?’; संजय राऊतांचा मोदींना सवाल

नवी दिल्ली | गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. परराष्ट्र व संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फलित असून, चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय.

लडाख, गलवान व्हॅली चीनच्या जबड्यात गेली व आपण सुटकेचा मार्ग शोधत आहोत. आता ट्रम्पही निवडणूक हरतील अशी स्थिती आहे. ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केले?, असा सवाल संजय राऊतांनी मोदींना केला आहे.

गडबड, गोंधळ सीमेवर नसून दिल्लीतच आहे, असं फार पूर्वी मोदी म्हणाले होते, ते आता पटलं! चीनशी आपलं भांडण न संपणारं आहे; कारण या भांडणाचा सरळ संबंध आपण अमेरिकेशी ठेवलेल्या संबंधांशी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

गलवान व्हॅलीत चिनी सैन्य आले. आपल्या सैन्याने प्रतिकार केला. चीन म्हणते, हा सर्व भाग आमचाच. उलट तुम्हीच घुसखोरी केली. यावर आम्ही तसे चूप बसलो आहोत. हवा निघाली पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अमेरिकेचे ट्रम्प यांच्याही बाहुबली राजकारणाची हवा लडाख, गलवान व्हॅली प्रकरणात निघाली आहे, असं राऊत यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांत दर 2 वर्षांनी मॅनेजर टीम बदलायचा; या प्रकरणी आतापर्यंत 16 जणांचे जबाब

-सुशांत सिंह आणि सलमान खानचे फॅन आमनेसामने, चाहत्यांच्या वादावर सलमान खान म्हणाला…