“राष्ट्रवादीचे गणेश नाईक आपलं सामाज्र वाचवण्यासाठी भाजपमध्ये येत आहेत”

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपात प्रवेश करत आहेत. पक्षाची गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यात नवी मुंबईच्या राजकारणातील बडे प्रस्थ असणारे गणेश नाईक भाजपात प्रवेश करणार असल्याचं कळतंय. मात्र त्यांच्या भाजपप्रवेशाच्या अगोदरच भाजप आमदार मंदा म्हात्रे नाराज आहेत.

गणेश नाईक आपलं सामाज्र वाचवण्यासाठी भाजपमध्ये येत आहेत, अशी जोरदार टीका त्यांनी गणेश नाईक यांच्यावर केली आहे. त्यांना भाजपबद्दल आपुलकी नाही, अशी टीका करत बेलापूरमधून पुन्हा एकदा मलाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

गणेश नाईक यांचा भाजपप्रवेश ही निव्वळ स्टंटबाजी आहे. पक्षश्रेष्ठी मला योग्य तो न्याय देतील, असं म्हात्रे म्हणाल्या आहेत.

गणेश नाईक नवी मुंबई महानगरपालिकेतल्या 57 नगरसेवकांना घेऊन भाजपात प्रवेश करणार असल्याचं कळतंय. कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती मिळत आहेत.

दरम्यान, गणेश नाईक राष्ट्रवादीतलं मोठं नाव आहे. नवी मुंबई आणि ठाणे या भागातील राष्ट्रवादीचा सर्वांत मोठा चेहरा आहे. त्यांचा भाजपप्रवेश हा राष्ट्रवादीला खूप मोठा धक्का मानण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रोहित शर्मा बरोबरच्या वादावर विराट कोहलीचा मोठा खुलासा!

-आता 11 वीच्या पुस्तकात ‘समलैंगिक विवाह आणि लिव्ह इन रिलेशनशीप’चा धडा!

-चाकणकरांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली!

-एकदिवसीय विश्वचषकानंतर आता थरार कसोटी विश्वचषकाचा! आयसीसीने केलं वेळापत्रक जाहीर

-भाजपा प्रवेश देणे आहे पण नियम व अटी लागू…; ‘पुणेरी स्टाईल पोस्टर’बाजी!