नवी मुंबई | शरद पवारांना माहिती आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का सोडला. त्यांनी अधिकाराने मला सुनावलं, तर मी गप्प बसेन, असं उत्तर भाजप आमदार गणेश नाईक यांनी दिलंय.
राष्ट्रवादीचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शाब्दिक वादावादी झाल्यानंतर नाईकांनी भावना व्यक्त केल्या. ते नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
मी राष्ट्रवादीमध्ये 20 वर्ष काम केलं होतं. मला आतापर्यंत शरद पवार काहीही बोलले नाही. त्यांनाही माहिती आहे की मी पक्ष कशासाठी सोडला. आणि मलाही माहिती आहे की मी काय गमावलं, असं गणेश नाईक यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मला इन्कम टॅक्स, ईडी किंवा कुठल्याही गुंडाकडून भीती नाही. माझा हात साफ आहे, असं गणेश नाईक म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा; सावकारी कर्जही करणार ठाकरे सरकार माफ
-“चांदमियां पाटील, राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते”
-होळीत कोणतंही झाड जाळू नका, मनातून अंधश्रद्धा दूर करा- सयाजी शिंदे
-अजित पवारांनी घेतला कोरोनाचा धसका, म्हणाले लांबूनच करा नमस्कार
-ज्येष्ठांसाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी केली मोठी घोषणा