महाराष्ट्र मुंबई

गरवारे क्लबमध्ये भाजपची ‘मेगा भरती’; ‘भाजप जोमात राष्ट्रवादी कोमात…!’

मुंबई |  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग चालू आहे. आज 31 जुलै रोजी भाजपने राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला. गरवारे क्लबमध्ये भाजपची मेगा भरती पार पडली. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेत आगामी विधानसभेला पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करू, असा निर्धार व्यक्त केला.

शरद पवार यांचे एकेकाळचे साथी मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड, जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, नवी मुंबईचे आमदार संदीप नाईक आणि चित्रा वाघ यांनी भाजपात प्रवेश केला.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवशी मुहूर्त साधत राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.

गरवारे क्लबमध्ये लोकसभेच्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला भाजपने धक्क्यावर धक्के दिले होते. सुजय विखे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपच्या गोटात सामिल करून घेतलं होतं. 

आतापर्यंत जे प्रवेश झाले त्यामुळे निष्ठावंतावर अन्याय होणार नाही. शिवसेना भाजप युती कायम राहिल. भाजप प्रवेशाने कोणाचीही अडचण होणार नाही, असं आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना दिलं.

दरम्यान, काल मुख्यमंत्री आणि शरद पवार मुंबईत काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला एकाच मंचावर आले होते. यावेळी त्यांच्यात जोरदार राजकीय टोलेबाजी पहायला मिळाली.

महत्वाच्या बातम्या-

-…तर मी अमित शहांना भेटायला गेल्याचं छापलं असतं- शरद पवार

-सुनिल तटकरे गेले चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर अन् नव्या राजकीय चर्चांना उधाण

-शरद पवार शेजारी बसलेले… अन् मुख्यमंत्री फोडाफोडीच्या राजकारणावर म्हणतात…

-पवार साहेब… ‘या’ नेत्याने पद्धतशीरपणे राष्ट्रवादीचं वाटोळं केलंय- जितेंद्र आव्हाड

-शोलेचा डायलॉग बदलून आता म्हणावं लागतंय ‘जो डर गया वो भाजप में गया’!

IMPIMP