विनाअनुदानित ग‌ॅस सिलेंडर महागला; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री!

नवी दिल्ली : विनाअनुदानित ग‌ॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. गॅसच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य वर्गातील लोकांना याचा फटका बसणार आहे. इंडियन आ‌ॅइल काॅर्पोरेशनच्या माहितीनुसार गॅस सिलेंडरच्या दरात 15.50 रुपयांनी वाढ केली आहे.

आ‌ॅगस्टमध्ये गॅसची किंमत 574.50 रु. इतकी होती. दोन महिन्यांच्या किमतीमध्ये झालेल्या घसरणीनंतर हे दर वाढले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये गॅसच्या दरात 546 वरुन 562 रु. इतकी करण्यात आली आहे. तर कोलकातामध्ये 601 रु. वरून 616.50 पैसे तर चेन्नईमध्ये 590 रु. मिळणारा गॅस 606 रु. मिळणार आहे. 

गेल्या महिन्यात विनाअनुदानित घरगुती गॅसच्या किमतीत 100.50 रु. कपात करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारत दरकपात झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढल्याने हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरवाढीमुळे सामान्य वर्गाच्या खिशाला याची झळ बसणार आहे. त्यासोबतच गृहिणींचे मासिक आर्थिक बजेट डगमगणार असल्याचं दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-