मुंबई | व्यवसायीकांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी (LPG) सिलेंडर स्वस्त होण्याची अपेक्षा होती, मात्र सिलेंडरच्या किमती 100 रुपयांनी वाढल्या आहेत. सर्वसामान्यांच्या दृष्टिने दिलासादायक गोष्ट म्हणजे, घरगुती सिलेंडरचे दर स्थिर असून, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र व्यवसायिक सिलेंडर 100 रुपयांनी वाढवण्यात आला आहे.
सिलेंडरचे दर वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिलेंडरच्या नव्या दरानुसार आता दिल्लीमध्ये व्यवसायिक सिलेंडर 2100 रुपयांच्या पुढे गेला आहे.
नव्या दरानुसार दिल्लीमध्ये व्यवसायिक सिलेंडरची किंमत 2100 रूपये झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी ती किंमत 1733 रुपये इतकी होती. याचाच अर्थ गेल्या साठ दिवसांमध्ये सिलेंडरच्या दरात तब्बल चारशे रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबईमध्ये सध्या व्यवसायिक गॅस सिलेंडरचे दर 2051 रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकातामध्ये 2174.50 रुपये तर चेन्नईमध्ये 19 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी 2234 रुपये मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर कमी होतील असा अंदाज वर्तवला जात होता. ज्याप्रमाणे केंद्राने पेट्रोल, आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करून, सर्वसामान्यांना दिलासा दिला. तसाच काहीसा निर्णय गॅस सिलिंडरबाबत देखील होऊ शकतो, अशी अपेक्षा होती.
याउलट गॅस सिलेंडरचे दर आज पुन्हा एकदा शंभर रुपयांनी वाढवण्यात आले आहे. याचा मोठा आर्थिक फटका हा व्यवसायिकांना बसणार असून, यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Twitterचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांना आहे इतका पगार; आकडा ऐकून थक्क व्हाल
फक्त ‘या’ एका गोष्टीमुळं पतंगराव वसंतदादांच्या नजरेत भरले!, पुढं आयुष्य बदललं
‘तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ’; ‘या’ शिवसेना नेत्याचा तटकरेंना टोला
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; एअर इंडियानंतर ‘या’ कंपनीला विकणार
वेगाने वजन कमी करण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा!