मुंबई | पेट्रोल डिझेल दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलेंडरही महाग झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर इंधन दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
मागील वर्षी 6 ऑक्टोबरला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग झाला. त्यामुळे महागाईचे चटके सहन करणाऱ्या जनतेला आणखी एक झटका बसला आहे.
काही दिवसांपूर्वी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ झाली आहे. मुंबईत आता एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 949.50 रुपये मोजावे लागणार आहेत.
कोलकातामध्ये 976 रुपये, तर चेन्नईत 965.50 रुपये इतका दर झाला आहे. लखनऊमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 987.50 रुपये मोजावे लागणार आहे.
पाटणामध्ये गॅस सिलेंडरच्या दराने 1000 रुपयांचा आकडा ओलांडला आहे. पाटणामध्ये एलपीजी गॅसचा दर 1039.50 रुपये झाला आहे.
दरम्यान, आजपासून देशात पेट्रोल-डिझेल महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून (oil companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात झाल्याचं दिसतंय.
महत्त्वाच्या बातम्या-
संस्कार, संस्कृती, सन्मान…; 125 वर्षीय स्वामी शिवानंदांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदीही नतमस्तक
‘वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर…’; संजय राऊतांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर
मोठी बातमी! सर्वसामान्यांना महागाईचा झटका, पेट्रोल-डिझेल महागलं
‘कोरोना संपलेला नाही अजून…’, अमेरिकेतील दिग्गज डॉक्टराचा जगाला अत्यंत गंभीर इशारा
राज्यातील ‘या’ भागात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता!