साताऱ्यात ‘या’ ठिकाणी आढळतंय चक्क विहीरींमध्ये पेट्रोल, अनेक विहीरी पेट्रोलने गच्च! पाहा व्हिडीओ

सातारा | अलिकडे काही महिन्यांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव गगणाला भिडले आहेत. इंधनांच्या वाढत्या भावामुळे सामान्य नागरिक गाड्या रस्त्यावर उतरवण्यास घाबरु लागले आहेत. अशातच आता चोरांनी देखील  पैसे, दागिने किंवा इतर माैल्यावान गोष्टी सोडून आपला मोर्चा थेट पेट्रोलकडे वळवल्याची घटना साताऱ्यात घडली आहे.

गेेल्या काही दिवसांपासून साताऱ्यातील सासवड गावाजवळच्या विहिरींमध्ये पेट्रोल आढळू लागलं आहे. मात्र, हे पेट्रोल नैसर्गिकरित्या विहीरींमध्ये आढळून आलं नाही तर काही अटखोर चोरांमुळे साताऱ्यातील विहीरींमध्ये पेट्रोल आढळून येत आहे.

सासवड गावाजवळून हिंदुस्तान पेट्रोलियमची मुंबई-पुणे-सोलापूर अशी पाईपलाईन जाते. ही पाईपलाईन जवळपास 223 किलोमीटरची आहे. काही चोरट्यांनी सासवड गावाजवळ या पाईपलाईनला भलेमोठे भगदाड पाडले आणि लाखोंच्या पेट्रोलवर ग.ड्डा घातला.

चोरट्यांनी पेट्रोल चोरुन तिथून काढता पाय घेतला आणि भगदाड  पाडलेली पाईपलाईन तशीच खुली ठेवली. यामुळे या भागातील जमिनीत खूप मोठ्या प्रमाणात पेट्रोल मुरले. येथील जमिनीत पेट्रोलचा फार मोठ्या प्रमाणात निचरा झाला असल्याने येथील पिकांचे आणि जमिनीचे देखील खूप नुकसान झाले आहे.

या परिसरातील जवळपास 2 विहीरी पेट्रोलने गच्च भरल्या आहेत. या घटनेनंतर सासवड परिसरात एकंच खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी विहीरींमध्ये पेट्रोल आढळू लागलं आहे त्या परिसरात सध्या बघ्यांची गर्दी जमू लागली आहे.

सासवड जवळील या गावात आणखी कोणता चुकीचा प्रकार घडायला नको म्हणून पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. या ठिकाणी कडेकोट पोलिस बं.दोबोस्त ठेवण्यात आला आहेे. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या देखील संपूर्ण परिसरात तैनात आहेत.

दरम्यान, पेट्रोल डिझेलचे वाढते दर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सध्याचे केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराचे खापर पूर्वीच्या सरकारवर फोडत आहे. इंधनाच्या वाढत्या भावावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. मात्र, सामान्य नागरीकच यामध्ये चेपला जात आहे.

पेट्रोल दरवाढ हा एक राष्ट्रीय प्रश्नच बनला आहे. पेट्रोल दरवाढीवरुन नेटकरी नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. तसेच देशभरातून इंधनाचे दर कमी व्हावेत, अशी मागणी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘माझ्या स्तनांची सर्जरी करण्यास सांगितलं अन्…’; दिपिकाचा धक्कादायक गाैप्यस्फोट!

मोठी बातमी! बाॅलिवूडवर इन्कम टॅक्सची धाड, ‘या’ बड्या कलाकारांवर होणार कारवाई

बिकनी शूटसाठी चक्क दोन दिवस उपाशी, ‘या’ अभिनेत्रीचा अजब खुलासा…

श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त वडिल शक्ति कपूर झाले भावूक, म्हणाले…

भारतीय संघातील ‘हा’ वेगवान गोलंदाज लवकरच बांधणार लग्नगाठ