सुशांत प्रकरणातील ड्रग्स्डीलर समजला जाणाऱ्या गौरव आर्याचा मोठा खुलासा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सुशांत सिंह राजपूत मृ.त्युप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयच्या हाती सोपवला आहे. सीबीआय याप्रकरणी अतिशय वेगानं तपास करत असून सीबीआयच्या हाती रोज नवनवीन गोष्टी लागत आहेत.

ईडीला तपासादरम्यान रियाच्या मोबाईलमध्ये एका ड्र.ग्ज डीलरचा नंबर मिळाला होता. तसेच ईडीनं रियाचं व्हाट्सअॅप चॅट सीबीआयसोबत शेअर केले आहेत. या व्हाट्सअॅप चॅटमधून ड्र.ग्ज संबंधित अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं रियावर ड्र.गचं सेवन केल्याचा आणि व्यापार केल्याचा आरोप केला आहे.

रिया व्हाट्सअॅपवरुन अनेकांशी ड्र.ग्जविषयी बोलली आहे. एका व्हाट्सअॅप चॅटमध्ये रिया गौरव आर्या नावाच्या व्यक्तीशी व्हाट्सअॅपवर बोलली आहे. गौरव आर्या हा एक ड्र.ग डीलर असल्याचं म्हटलं जात आहे. जर आपण हार्ड ड्र.ग्ज विषयी बोललो तर मी ते जास्त वापरले नाहीत, असं गौरव 8 मार्च 2017 रोजी रियाला म्हटला होता.

ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं रियाविरुध्द तक्रार दाखल केली असून आपला तपास सुरु केला आहे. रिया ज्या गौरवबरोबर व्हाट्सअॅपवरुन ड्र.ग्जविषयी बोलली होती तो गौरव गोव्यातील एका रेस्टॉरंटचा मालक आहे. ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम गौरवला शोधण्यासाठी गोव्याला रवाना झाली आहे. अशातच गौरवनं माध्यमांना महत्वाची माहिती दिली आहे.

रिया चक्रवर्ती आणि ड्र.ग्जविषयी आपला काहीही संबंध नाही. 2017 नंतर आपण रियाला केव्हाही भेटलेलो नाही, अशी माहिती गौरव आर्यानं दिली आहे.

दरम्यान, रिया ड्र.ग घेत असल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर रियाच्या वकिलांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. रियानं तिच्या आयुष्यात केव्हाच ड्र.ग्ज घेतले नाहीत. या गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी रिया केव्हाही आपली ब्लड टेस्ट करण्यासाठी तयार असल्याचं रियाच्या वकिलांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“ रियाच्या कुटुंबाकडून सुशांतवर तीन महिने जादूटोणा चालु होता”

‘लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं’; सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठाकरे गरजले

महाडनंतर आता मुंबईतील नागपाड्यात इमारतीचा भाग कोसळला; ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याची शक्यता

काय सांगता! आलं केसांसाठी वरदान ठरू शकतं?; वाचा सविस्तर