अंकिताच्या घरी देखील गौरीचं आगमन, पाहा खास व्हिडीओ

मुंबई | सर्वत्रच गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या थाटात झालं आहे. सध्या घराघरात मंगलमय वातावरण आहे. मनोरंजन विश्वातील अनेक बड्या कलाकारांनी देखील आपल्या घरी गणपती बाप्पाची मोठ्या उत्साहाने स्थापणा केली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या देखील घरी गणपती बाप्पा बसले आहेत.

गणरायासोबतच अंकिताच्या घरी गौरीचं देखील आगमन झालं आहे. अंकिताने नुकताच सोशल मीडियावरुन गौरीच्या आगमानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताची आई आणि कुटुंबातील इतर महिला गौरीचं घरामध्ये आवाहन करताना दिसत आहेत.

अंकिताने गौरी गणपती सोबतचे काही फोटोज देखील शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये अंकिता मनोभावे गौरीला वंदन करताना दिसत आहेत. या फोटोजमध्ये अंकिताचे रुप देखील अगदी खुलून दिसत आहे. तसेच अंकिताच्या घरी केलेला गौरीचा साज देखील या फोटोजमध्ये पाहायला मिळत आहे.

अंकिता एक मराठी मुलगी आहे. प्रत्येकच सण अंकिता मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसते. तसेच अंकिता मराठमोळ्या पोषाखातील फोटोज देखील सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. चाहते देखील अंकिताच्या फोटोजवर भरभरून प्रेम दर्शवतात.

दरम्यान, अंकिता सध्या ‘पवित्र रिश्ता 2’ या मालिकेच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. पवित्र रिश्ताच्या पहिल्या पर्वात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत अंकिता बरोबर मुख्य भूमिकेत दिसला होता. मात्र, या पर्वात आता सुशांतने केलेली मानवची भूमिका अभिनेता शाहिर शेख करत आहे.

सुशांतच्या मृत्यूला आता एक वर्ष लोटून गेलं आहे तरी देखील अंकिता सुशांतला विसरू शकली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिताने तिला मानवमध्ये सुशांतचा आवाज ऐकू येत असल्याचं म्हटलं होतं.

https://www.instagram.com/p/CTtzqploM3h/

महत्वाच्या बातम्या-

‘…मला अजूनही सुशांतचा आवाज ऐकू येतो’; सुशांतच्या आठवणीत त्याची एक्स गर्लफ्रेंड व्याकूळ

बोटमध्ये चप्पल घालून चढणाऱ्या ‘या’ बड्या अभिनेत्रीला अटक

सिद्धार्थची ‘त्या’ रात्रीच्या अर्ध्या तासाची कॉल हिस्टरी समोर, विशालने केला खुलासा

…म्हणून मामा भाच्यातील वाद पेटला; वाचा गोविंदा आणि कृष्णातील भांडणाचं कारण

दुसऱ्या तरूणीसोबत गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला रंगेहात पकडलं, अन् मग…; पाहा व्हिडीओ