जगातील 1.6 कोटींहून अधिक घरे होणार प्रकाशमय; हा प्रकल्प सुरु

Renewable Energy Park l जगातील सर्वात मोठ्या ग्रीन एनर्जी पार्कमधून विजेचे उत्पादन सुरू झाले आहे. देशातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा (Renewable Energy Park) कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने गुजरातमधील खवडा येथे 551 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. याद्वारे नॅशनल ग्रीडला वीज पुरवठा केला जाणार आहे. कंपनीचा दावा आहे की या प्लांटमुळे 1.6 कोटींहून अधिक घरे उजळली जाऊ शकतात. तसेच वार्षिक 58 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी केले जाऊ शकते. तसेच या प्रकल्पातून 81 अब्ज युनिट वीजनिर्मिती करता येणार आहे. (Adani Green Energy)

Renewable Energy Park l कंपनी हा प्लांट 30 गिगावॅट क्षमतेपर्यंत घेऊन जाणार :

अदानी ग्रीन एनर्जीनुसार या प्लांटचे काम अवघ्या 12 महिन्यांत पूर्ण झाले आहे. कच्छच्या रणमध्ये असलेला हा मोठा प्लांट तयार करण्यासाठी रस्त्यांसह सर्व आवश्यक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. कंपनीच्या या प्लांटमध्ये सुमारे 8000 कर्मचारी काम (Adani Green Energy) करतात.

कंपनीने दावा केला आहे की, या प्लांटमुळे अंदाजे 15200 नोकऱ्या निर्माण होतील. यामुळे जे कार्बन उत्सर्जन कमी होईल ते अंदाजे 1.26 कोटी कार रस्त्यावरून हटवण्याइतके आहे. हा प्लांट 30 गिगावॅट क्षमतेपर्यंत नेण्याची कंपनीची योजना आहे. यासाठी 5 वर्षांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य केल्याने खवरा प्लांट जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प (Renewable Energy Park) बनेल.

ग्रीन एनर्जी जगातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा तयार करणार :

Renewable Energy Park l अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, अदानी ग्रीन एनर्जी जगातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा तयार करत आहे. खवडा प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. भारताने 2030 पर्यंत 500 GW अक्षय ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अदानी समूह पूर्ण सहकार्य करणार आहे. अदानी ग्रीन एनर्जीकडे सध्या 9029 मेगावॅटचे ऑपरेटेड प्लांट आहेत, जे 12 राज्यांमध्ये पसरलेले आहेत. कंपनीची एकूण उत्पादन क्षमता 20,844 मेगावॅट आहे. (Renewable Energy Park)

News Title : Renewable Energy Park

महत्वाच्या बातम्या –