“धोनीने मनमानी थांबवून निवृत्तीचा विचार करावा”

नवी दिल्ली : धोनीने मनमानी थांबवून निवृत्तीचा विचार करावा. निवृत्तीचा निर्णय हा प्रत्येक खेळाड़ूचा असतो, असं म्हणत भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनं महेंद्रसिंह धोनीवर निशाणा साधला आहे..

निवड समितीनं धोनीशी चर्चा केली पाहिजे आणि त्याची नेमकी रणनीती काय आहे हे विचारावं, असं गंभीरने म्हटलं आहे. 

जर तुम्ही देशासाठी खेळत आहात तर, कोणती मालिका खेळावी हा निर्णय तुम्ही घेऊ नाही शकत, असं मत गौतम गंभीरनं  व्यक्त केलं आहे.

महेंद्रसिंग धोनीनं दोन महिने क्रिकेटपासून दूर आहे. धोनीनं वर्ल्ड कपनंतर एकही सामना खेळलेला नाही आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या मालिकेत धोनीला संघात स्थान देण्यात आलं नव्हते.

वर्ल्ड कप संपल्यानंतर खर तर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा होत होत्या 38 वर्षीय धोनी निवृत्तीची घोषणा करणार असे वाटत असताना धोनीनं लष्करात ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार धोनीनं महिनाभर काश्मीरमध्ये टेरिटोरियल आर्मीमध्ये ट्रेनिंग घेतले. 

महत्वाच्या बातम्या-