काश्मीरबाबत बेजबाबदार वक्तव्य; गौतमने केली शाहीदची कानउघडणी

नवी दिल्ली : राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम 370 बाबत निर्णय घेण्यात आला. मोदी सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयावरुन अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

संयुक्त राष्ट्राकडून देण्यात आलेले हक्क काश्मीरच्या जनतेला देण्यात यावे. संयुक्त राष्ट्र संघटनेची निर्मिती का होत नाही, ते झोपले आहेत का???, असा सवाल करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद अफ्रिदीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शाहीद अफ्रिदीनेे केलेल्या ट्वीटची चर्चा होताच क्रिकेटपटू आणि दिल्ली पूर्व मतदारसंघाचे खासदार गौतम गंभीरने शाहीदची गंभीर कानउघडणी केली आहे. 

आक्रमकता, मानवाविरोधात गुन्हे घडत आहेत हे खरं आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शाहीदचे प्रशंसाच केली पाहिजे, असं उपरोधात्मक ट्वीट गौतम गंभीरने केलं आहे.

इथे अफ्रीदी एक गोष्ट विसरला आहे की, या सगळ्या गोष्टी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घडत आहेत… बर काही हरकत नाही…यावरही तोडगा निघेल, असं ट्वीट करत गौतमने बेजाबदार वक्तव्य करणाऱ्या शाहीद अफ्रीदीची कानउघडणी केली आहे. 

दरम्यान, मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावरुन जगभरातून अनेकजण आपली प्रतिक्रिया देत आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

-भाऊ कदम आता नव्या रंगात अन् नव्या ढंगात येणार तुमच्या समोर!

-…हा तर सत्तेचा गैरवापर; राहुल गांधींची सरकारवर टीका

-अनाजीपंतानं उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये फूट पाडली- छगन भुजबळ

-कलम 370च्या निर्णयानंतर आता बेळगाव महाराष्ट्राला द्या- नितेश राणे

-अमित शहा भडकले; म्हणाले…त्यासाठी जीवही देऊ