जिओकडून नव्या प्लॅनची घोषणा, अनलिमिटेड कॉलिंगसह नेटही मिळणार!

मुंबई | रिलायन्स जिओने मार्केटमध्ये उतरताच आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना आपल्या इंटरनेट तसेच व्हाईस पॅकचे दर कमी करण्यास भाग पाडलं होतं, अनेक कंपन्यांनी तर यामुळे तोटा सहन करावा लागत असल्याचा आरडाओरडा सुरु केला होता.

सुरुवातीला फ्री प्लॅन दिल्यानंतर मध्यंतरी जिओने सुद्धा आपल्या सर्वच प्लॅन्सची किंमत वाढवली होती. आता मात्र जिओनं आपल्या नव्या प्लॅनची घोषणा केली आहे.

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) नंतर आता खासगी क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) दोन जबरदस्त प्लान लाँच केले आहेत. कंपनीने वर्क फ्रॉम होम श्रेणीमध्ये हे दोन्ही प्लान सादर केले आहेत.

त्यांची किंमत 2,878 रुपये आणि 2,998 रुपये आहे. विशेष म्हणजे, यामध्ये तुम्हाला वर्षभरासाठी 2 GB आणि 2.5 GB डेटा मिळणार आहे. दोन्ही योजना कंपनीच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आल्या आहेत.

रिलायन्स जिओचा 2878 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना 365 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा ऑफर करतो. म्हणजेच या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 730GB डेटा मिळेल.

एकदा डेटा मर्यादा संपली की, इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लान असल्याने, यात व्हॉईस कॉल आणि एसएमएससारखे फायदे मात्र मिळणार नाहीत. म्हणजेच तुम्हाला व्हॉइस कॉल आणि एसएमएससाठी दुसरे रिचार्ज करणे आवश्यक राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

कोरोनाचा विस्फोट होऊ लागल्यानंतर मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट, म्हणाले… 

‘कॉपी करताना सापडल्यास…’; वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय 

“भाजपचा शिमगा रोज सुरूये, आम्ही शिमगा सुरू केला तर…” 

“पवार साहेब, आमची काळजी करू नका, स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा” 

“आमच्याशिवाय काँग्रेसला सत्तेचा गुलाल लागणार नाही”