‘या’ जर्मन कंपनीची चीनमधून एक्झिट; भारतात सुरू करणार प्रकल्प

नवी दिल्ली | चीनमधील अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी मूळ भारतीय असलेल्या लावा या कंपनीनं चीनमधून आपला व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता जर्मनीची बूट तयार करणारी कंपनी वॉन वेल्सनं आपला चीनमधील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वॉन वेल्सनं कंपनी भारतात आपला प्रकल्प सुरू करणार आहे. वॉन वेल्स ही कंपनी उत्तम आणि दर्जेदार फुटवेअर्स तयार करणारी कंपनी म्हणून परिचित आहे.

कंपनीनं नुकताच चीनमधील आपला व्यवहार गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त लवकरच भारतात आपलं उत्पादन सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. आग्र्यामध्ये ही कंपनी आपला नवा प्रकल्प सुरू करणार आहे. यासाठी कंपनीनं लॅस्टीक इंटस्ट्रीजसोबत करारही केल्याचं कळतंय.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनमधून बाहेर पडून अन्य देशांमध्ये आपला व्यवसाय हलवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक मोबाईल कंपन्या आणि ईलेक्ट्रीक कंपोनंट तयार करणाऱ्या कंपन्याही भारतात येण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कर्नाटकात 31 मेपर्यंत महाराष्ट्र, गुजरातसह चार राज्यांमधील नागरिकांना प्रवेश नाही- येडियुरप्पा

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

-तुझ्या भीक माग्या देशासाठी काहीतरी कर; ‘या’ भारतीय क्रिकेटपटूचा आफ्रिदीला कडक सल्ला

-… तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला गणवेश बदलावा लागला नसता- अनुराग कश्यप

-आफ्रिदी गेला खड्ड्यात, देशासाठी मी बंदूक उचलेन- हरभजन सिंग