नवी दिल्ली | कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचा वाढता प्रसार जगभरातील देशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सर्वच देश सतर्क झाले आहेत. ओमिक्रॉनला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत.
कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) ओमिक्रॉनला रोखण्यासाठी प्रभावी असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. मात्र, ओमिक्रॉनचा फैलाव बघता काही देश दोन बूस्टर डोस देण्याच्या विचारात आहेत.
ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग बघता जर्मनीने (Germany) चौथा कोविड बूस्टर देत असल्याची घोषणा केली आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानूसार ओमिक्रॉन व्हेरिएंटला लक्षात घेऊन बनवलेल्या विशेष लसीच्या लाखो डोसची जर्मनीने ऑर्डर दिली आहे.
मॉडर्नाची लस सध्या बूस्टर डोस मोहिमेत वापरली जात आहे. तर नोवाव्हॅक्स लसीचे 4 दशलक्ष डोस व नवीन व्हॅलनेवा लसीचे 1.1 कोटी डोस जर्मनीने ऑर्डर केले आहेत.
इस्त्राईल आणि जर्मनी या देशात कोरोनाबाधीतांचा आकडा वाढत आहे. ओमिक्रॉनचा वाढता धोका बघता जर्मनीने बूस्टर डोसची घोषणा केली आहे. कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी लसीचा चौथा डोस आवश्यक असल्याचं जर्मनीचे आरोग्यमंत्री कार्ल लॉटरबॅक यांनी स्पष्ट केलं आहे.
जानेवारीच्या मध्यापर्यंत ओमिक्रॉन सर्वात प्रभावी होईल, असा इशारा जर्मनीच्या रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटच्या रोग नियंत्रण प्रमुखांनी दिला आहे. ओमिक्रॉनची लाट उसळली तर ती आरोग्य यंत्रणांना वेठीस धरू शकते, असंही या रोग नियंत्रण प्रमुखांचं म्हणणं आहे.
दरम्यान, भारतात ओमिक्रॉनबाधीत रूग्णांची वाढती संख्या बघता केंद्र सरकार सतर्क झालं आहे. ओमिक्रॉनला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊलं उचलायला सुरूवात केली आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहिती सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे. रात्रीची संचारबंदी गर्दीच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध कठोर करण्याचे आदेश केंद्राने राज्यांना दिले आहेत.
देशात सर्वात जास्त ओमिक्रॉनबाधीत महाराष्ट्रात आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत 14 राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याने चिंता वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या-
फक्त बूस्टर डोस घेऊन फायदा नाही, Omicron ला रोखायचं असेल तर…
दिलासादायक! रूग्णालयात भरती न होता omicron बाधीतांचे बरे होण्याचे प्रमाण जास्त
राज्यात नाईट कर्फ्यू लागणार का?; मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक
“ती गाडी कोणाची होती?, त्या दिवसापासून सुशांत सिंह राजपूत…”, मलिकांचा सवाल
बहुप्रतिक्षित शक्ती कायदा बहुमताने मंजूर, विरोधकांकडूनही कायद्याचं स्वागत