आता बस, कार सोडा… EV फ्लाइंग टॅक्सीनं ऑफिसला जा!

नवी दिल्ली | दररोजच्या धगधगत्या आयुष्यात कामापेक्षा जाण्यायेण्याचा सर्वांना कंटाळा येतो. ट्राफिक, कार, बस, सिगन्ल ही दररोजची कटकट. अशातच आता सर्वांसाठी गुडन्यूज समोर आली आहे.

एअर एशिया एव्हिएशन ग्रुप आग्नेय आशियामध्ये ‘एअर राईड-शेअरिंग सेवा’ सुरू करणार आहे. सेवा सुरू करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सींचा 100 फ्लाइंग कार मजबूत ताफा सुरू करण्याची योजना आखली आहे.

कंपनी एव्हलॉनकडून किमान 100 फ्लाइंग टॅक्सी भाड्याने घेणार आहे. कंपनी आपल्या एअर राईड-हेलिंग सेवेसाठी एव्हलॉन तर व्हर्टिकल एरोस्पेस VX4 विमानाचा फ्लाइंग टॅक्सी म्हणून वापर करणार असल्याचं सांगण्यात आलंय.

या वर्षी एप्रिलमध्ये पहिले VX4 चाचण्या होण्याची शक्यता आहे. या फ्लाइंग टॅक्सी लीज प्रयोगासाठी दोन्ही कंपन्यांनी आधीच करारावर स्वाक्षरी केल्या आहेत.

VX4 विमान 250 किलो वजनाचे पेलोड वाहून नेऊ शकतं. कंपनीचा असाही दावा केलाय की, ही विमाने शक्तिशाली बॅटरी पॅकसह येतात जी सर्व रोटर्सना वीज पाठवण्यास मदत करते.

VX4 विमान ताशी 80 किमी वेगाने उड्डाण करू शकतात, अशी माहिती देखील कंपनीने दिली आहे. हेलिकॉप्टरप्रमाणे ते विमान एकाच ठिकाणी फिरू शकतं. विमानात जास्तीत जास्त चार प्रवासी आणि एक पायलट बसू शकतो.

विशेष म्हणजे हे विमान शहरी भागात आकाशात हवाई टॅक्सी म्हणून टेक ऑफ करण्यास सक्षम आहे. त्यामुळे आता लवकरच हवेतून ऑफिसला जाण्याची सर्वांची इच्छा पुर्ण होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या

“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”

अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!

“आमचे देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे”

‘संजय राऊत महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक, त्यांना….’; तुषार भोसले भडकले