मुंबई | भारतीय डाक विभाग सातत्यानं नवीन योजना घेऊन ग्राहकांना त्या योजनांचा लाभ देत असतं. परिणामी पोस्टाच्या योजनांचा लाभ मिळवणारे अनेकजण आहेत. अशात एक योजना सातत्यानं प्रसिद्ध होत आहे.
ग्रामीण भागातल्या लोकांसाठी भारतीय पोस्ट खात्यानं 1995 पासून आयुर्विमा योजनेअंतर्गत (Rural Postal Life Insurance Scheme) ग्राम सुरक्षा ही अभिनव योजना राबवली आहे.
ग्रामीण भागातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या नागरिकांना, विशेषत: महिलांना आर्थिक सुरक्षितता देण्याच्या उद्देशानं आणि आयुर्विम्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ही योजना चालवली जाते.
या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराने दरमहा साधारण 1500 रुपये गुंतवल्यास मुदतीअंती त्याला तब्बल 35 लाख रुपये मिळू शकतात.
दरमहा, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक विमा हप्ता भरण्याची सोय यात आहे. हप्ता भरण्यासाठी निश्चित केलेल्या तारखेच्या पुढे 30 दिवासांची अतिरिक्त मुदत असते. त्यामुळे हप्ता भरण्यात सुलभता असते.
या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीने 19 व्या वर्षी 10 लाखांची पॉलिसी घेतली, तर त्याला 55 वर्षांपर्यंत दरमहा 1515 रुपये हप्ता भरावा लागेल.
58 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी 1463 रुपये, तर 60 वर्षं वयापर्यंतच्या मुदतीसाठी 1411 रुपये हप्ता भरावा लागेल. 55 व्या वर्षी मुदत संपल्यानंतर 31 लाख 60 हजार रुपये, 58 व्या वर्षी 33 लाख 40 हजार रुपये आणि 60 व्या वर्षी मुदत संपल्यानंतर 34 लाख 60 हजार रुपये गुंतवणूकदाराला मिळतील.
महत्वाच्या बातम्या-
तरुणांसाठी मोठी बातमी; पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
“राज्यपालांनी हे ठाकरे सरकार बरखास्त करावं”
माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नातीची आत्महत्या, हे कारण आलं समोर ॉ
भय्यू महाराज प्रकरणाला नवं वळण; अत्यंत धक्कादायक माहिती समोर
“मिस कॉल देऊन जगातला मोठा पक्ष व्हायचं नाही”; नानांचं भाजपवर टीकास्त्र