‘कोरोना लस घेतल्याचे कार्ड दाखवा आणि एक बियर मोफत मिळवा’; ‘या’ ठिकाणी सुरू आहे अनोखी ऑफर

मुंबई | गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.

यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.

कोरोना महाआजाराशी सामना करण्यासाठी संपूर्ण देशभरात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. परंतू काहीजण या लसीवर संशय घेत असून, त्यामुळे काही लोक लस घेण्यास नकार देत आहेत. या समस्याचाही उपाय निघाला आहे. लोकांनी लस घेण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.

कोरोना लस घेतल्यावर त्या नागरिकाला एखादी भेटवस्तू देण्यात येतं आहे. यात डोक्यावर पाणी म्हणजे दिल्ली जवळील गुरूग्राममध्ये कोरोना लस घेतल्यानंतर चक्क बिअर भेटवस्तू म्हणून दिली जात आहे.

गुरूग्राम येथे ‘इंडियन ग्रिल रूम’ या रेस्टॉरंटमध्ये कोरोना लस घेतल्याचा पुरावा दाखवल्यानंतर बियर मोफत दिली जात आहे. ‘कोरोना लस घेतल्याचे कार्ड दाखवा आणि एक बियर मोफत मिळवा’ असा बोर्ड त्या हॉटेल बाहेर लावला आहे.

या मोहिमेला  ‘इंडियन ग्रिल रूम विथ व्हॅक्सिनेशन सेलिब्रेट ‘ असं नाव देण्यात आलं आहे. तसेच ही ऑफर 5 एप्रिलपासून सुरू झाली असून, आठवडाभर या ऑफरचा आनंद लोकांना मिळवता येणार आहे. याचप्रमाणे लसीकरणाला प्रोत्साहन म्हणून देशात अनेक ठिकाणी नागरिकांना वेगवेगळ्या भेटवस्तू, उपहार दिले जात आहेत. एका ठिकाणी तर कोरोना लस घेतल्यावर सोनं भेट म्हणून दिलं जात आहे.

दरम्यान, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडाही दररोज वाढीच्या दिशेने जात आहे. त्यामुळे राज्यात कोरोना लसींचा तुडवटा बडला आहे.

महत्वाच्या बातम्या-

शीतपेय दिले नाही म्हणून तरूणानी असं काही केलं की, ऐकूण…

कोरोना लसींवरचे राजकारण थांबवा म्हणत ‘या’…

डोळ्याखाली दुखापत होऊनही विराट खेळत राहिला! पाहा काळजाचा…

IPL 2021: यावर्षीही मुंबईची पहिली मॅच देवाला, रोमांचक…

रुपयात घसरण झाली अन् सोन्याचे दर वधारले, वाचा आजचे दर