Top news महाराष्ट्र मुंबई

माकडाशी पंगा घेणं तरूणाला पडलं महागात, पाहा व्हायरल व्हिडीओ

Photo Credit- Instagram/hayatvahsh_official

मुंबई | आजकाल अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ गाण्यांचे असतात. तर काही डान्सचे असतात. याही पलिकडे काही व्हिडीओ तर खूपच भयानक असतात. त्या व्हिडीओंना पाहून अंगावर काटाच उभा राहतो.

आपल्याला माहित आहे की, माकड हा खूप हुशार प्राणी आहे. सहसा कोणी माकडाच्या नादी लागत नाही. आणि तरीही जो कोणी लागतो, त्याला ते माकडं सोडल्याशिवाय राहत नाही. आपण काही पर्यटन स्थळी जातो. त्या ठिकाणी काही माकडंही असतात.

आपल्या हातात जे काही असेल, ते ती माकडं ओढून खात असतात. काही काही वेळातर काही लोकांच्या खाऊच्या सगळ्याच पिवशव्या माकडांनी पळवल्या असल्याचं आपण ऐकतो. एवढ असूनही त्या माकडांना विरोध करायची कोणाचीच हिंमत होत नाही.

परंतू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क एका तरूणानी माकडाला विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरूण रस्त्यावर खाली बसला आहे. त्याच्या हातात एक चपातीचा तुकडा असल्याचं दिसत आहे.

हे पाहून दोन माकडं त्या ठिकाणी येतात आणि त्याच्या हातातील तो चपातीचा तुकडा ओढून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतू तो तरूण आपली ताकद दाखवत, त्या माकडांना तो चपातीचा तुकडा काही केल्या देत नव्हता. हे बघून त्यातील एका माकडाने आपली हुशारी दाखवत त्या तरूणाच्या हातातील तो तुकडा हिसकाऊन घेतला.

त्यानंतर त्या तरूणाने त्या माकडाला मारण्याचा प्रयत्न केला. हे पाहून माकडानेही त्या तरूणाला दोन-तीन जोरात लाथा मारल्या असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. त्या माकडाकड्या एका हातात त्याची गाडी असल्याचंही दिसून येतं आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ‘hayatvahsh’ या यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्या तरूणावर जोक केले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत हा व्हिडीओ खूप लोकांनी पाहिला असून, जवळजवळ या व्हिडीओला 2 हजार लोकांनी लाईक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

अभिनेता सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली व्यक्त केली ‘ही’ खंत

भर मंडपात ब्राम्हणाने नवरीसोबत जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

बिबट्यानं हरणावर केला हल्ला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ

चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

पोझ देता-देता महिलेचा अचानक घसरला पाय अन्…, पाहा व्हिडीओ