महाराष्ट्र मुंबई

काँग्रेस राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात; गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | काँग्रेस राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शरद पवारांवर विश्वास राहिला नाही. त्यांच्या अपयशाचं खापर ते भाजपवर फोडत आहेत, असा आरोप गिरीश महाजनांनी केला.

काँग्रेस-राष्ट्रवादीत ज्यांना भविष्य दिसत नाही. ते लोक पक्ष बदलतात. आगामी काळात शरद पवारांकडे एक आकडी संख्या असणारे लोकही राहतात की नाही याकडे त्यांनी पाहावं, असा जोरदार हल्लाबोल महाजनांनी केला आहे.

आपल्या पक्षातून लोक का जातात याचं आत्मपरीक्षण पवारांनी करावं. उगीचच भाजपवर आरोप करू नयेत, असं महाजन म्हणाले. 

ईडी, एसीबी यांची नियमित चौकशी सुरु आहेत. त्यांच्या चौकशीत कुठेही मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे पवारांनी केलेले आरोप हे त्यांचे अपयश लपविण्यासाठी केले जात आहेत, असा आरोपही महाजनांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

“तुमच्या नेत्यांना पक्षात का राहू वाटत नाही त्याचं आत्मचिंतन करा”

-महाराष्ट्र लुटणाऱ्या त्या 250 घराण्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही- चंद्रकांत पाटील

-‘बाजी पलटने में देर नही लगती…’; धनंजय मुंडे यांचा भाजपवर हल्लाबोल

-“शरद पवारांच्या बाजूने एकतरी माणूस शिल्लक राहतो का बघा”

-“फडणवीस साहेब, भाजपची मेगाभरती थांबली असेल तर बेरोजगारीच्या भरतीकडे जरा पहा”

IMPIMP