महाराष्ट्र मुंबई

“शरद पवारांच्या बाजूने एकतरी माणूस शिल्लक राहतो का बघा”

मुंबई : काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षाला रामराम करत आहेत. त्यावर पक्षाध्यक्ष शरद पवारांनी भाजपवर टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही. त्याचं खापर भाजपवर फोडलं जातंय, असा आरोप गिरीश महाजनांनी केला आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीत ज्यांना भविष्य दिसत नाही. ते लोक पक्ष बदलतात. आगामी काळात शरद पवारांकडे एक आकडी संख्या असणारे लोकही राहतात की नाही याकडे त्यांनी पाहावं, असा जोरदार हल्लाबोल महाजनांनी केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील 50 पेक्षा जास्त आमदार भाजपमध्ये संपर्कात आहेत. आपल्या पक्षातून लोक का जातात याचं आत्मपरीक्षण करावं, असा इशारा महाजनांनी दिला आहे.

ईडी, एसीबी यांची नियमित चौकशी सुरु आहेत. त्यांच्या चौकशीत कुठेही मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे पवारांनी केलेले आरोप हे त्यांचे अपयश लपविण्यासाठी केले जात आहेत, असा आरोपही महाजनांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणत्या आमदारांना फोन केला हे पवारांनी दाखवून द्यावं, असा सवालही यावेळी महाजनांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“फडणवीस साहेब, भाजपची मेगाभरती थांबली असेल तर बेरोजगारीच्या भरतीकडे जरा पहा”

-भाजपसाठी मोकळ रान; काँग्रेस-जेडीएसचे 14 बंडखोर आमदार अपात्र घोषित

-भाजपात प्रवेश का चालू आहेत याचा जरा विचार करा; उगीच सहानभूती मिळवू नका- चंद्रकांत पाटील

-“पळपुट्यांना पळू द्या… आपण एकलव्य आहोत; विधानसभा जिंकून साहेबांना गुरूदक्षिणा देऊ”

-साथ सोडलेल्यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी आखली ‘ही’ मोठी रणनीती!

IMPIMP