चौकशीशिवाय अजित पवारांना तुरुंगात टाकायचं का?- गिरीश महाजन

मुंबई : सिंचन घोटाळ्यातील प्रतिज्ञापत्रात अजित पवारांना जबाबदार धरल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे मात्र गिरीश महाजनांनी यावर काहीशी वेगळी प्रतिक्रिया दिलीये. सरकार सूडबुद्धीने कारवाई करत नसून लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागामार्फत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. चौकशी यंत्रणांवर कुठलाही दबाव नाही, मात्र चौकशीशिवाय अजित पवारांना तुरूंगात टाकावं, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची ईच्छा आहे का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. चर्चेदरम्यान, इतकी वर्षे चौकशी सुरू असते का? असा प्रश्न जयंत पाटलांनी विचारल्यावर त्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

सुनावणीत नेमकं काय झालं?-

या घोटाळ्याप्रकरणी हायकोर्टात दाखल झालेल्या दोन जनहित याचिकांच्या सुनावणीत एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांनी मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले. घोटाळ्यास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार अाहेत, असा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आलाय.

विरोधी पक्षाचा सरकारवर हल्लाबोल-

जलसिंचन घोटाळ्याच्या याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. निवडणुकीच्या तोंडावर हे कारस्थान असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला होता. तर धनंजय मुंडे यांनी देखील सरकार या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचे म्हटले होते.

सत्ताधाऱ्यांचं विरोधकांना जोरदोर प्रत्युत्तर-

सरकार सूडबुद्धीने कारवाई करत नसून लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागामार्फत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. चौकशी यंत्रणांवर कुठलाही दबाव नाही, मात्र चौकशीशिवाय अजित पवारांना तुरूंगात टाकावं, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची ईच्छा आहे का? असा सवाल त्यांनी विचारला. चर्चेदरम्यान, इतकी वर्षे चौकशी सुरू असते का? असा प्रश्न जयंत पाटलांनी विचारल्यावर त्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदर प्रतित्युर दिलंय.