गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना मोलाचा सल्ला, म्हणाले…

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बहुचर्चित आणि बहुप्रलंबित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी भाजपचे मोठे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना देखील मंत्रिपद मिळाले. त्यानंतर ते जळगावमध्ये आले होते.

तेथे त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. एकनाथ खडसे म्हणाले, शिंदेंनी मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसी (OBC) समाजावर अन्याय केला.

त्यावर महाजन बोलत होते. नव्या मंत्रिमंडळात मी स्वत: आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) ओबीसी आहोत. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात ओबीसींवर अन्याय झाला, हा एकनाथ खडसेंचा दावा चुकीचा असल्याचे महाजन म्हणाले.

तसेच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारले, त्यांना विधान परिषदेवर देखील घेतले नाही. त्यामुळे त्यांच्यावर देखील भाजप अन्याय करत आहे, असे खडसे म्हणाले होते.

त्यावर देखील महाजनांनी खडसेंना सल्ला दिला आहे. आपण थोडे शांत राहा, तू तू मे मे करु नका, असे गिरीश महाजन म्हणाले. जळगावात प्रसार माध्यमांसोबत ते संवाद साधत होते.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर गिरीश महाजन प्रथमच जळगावात त्यांच्या मतदारसंघात आले होते. त्यावेळी त्यांच्या मतदार संघात त्यांचे जंगी स्वागत झाले. त्यांनी  कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

गेल्या अडीच वर्षोत राज्याचा विकास खुंटला होता. विकासाचा अनुशेष भरुन काढण्याचे मोठे आव्हान आता आमच्यासमोर आहे. राज्यात आता डबल इंजिनचे सरकार असल्याने रखडलेला विकास आता मार्गी लागणार आहे, असे यावेळी महाजन म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! भाजप प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची लागली वर्णी

‘अरे वा! मग शिवसेना माझीच’, उदयनराजेंचं मोठं वक्तव्य

“बंडाच्यावेळी शहिद झालो असतो”; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

दीपक केसरकरांचा बंडाबाबत खळबळजनक दावा, म्हणाले…

‘भाजपमध्ये आता फक्त फडणवीस एकटेच…’; भास्कर जाधवांची फडणवीसांवर टीका