“…नाहीतर तुमचे पंचवीस आमदारही निवडून आले नसते”

धुळे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray ) यांनी वांद्रे येथील सभेत भाजपवर केलेल्या टीकेनंतर भाजप नेत्यांकडून याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

उद्धव ठाकरेेंनी केलेल्या टीकेला आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते धुळ्यात माध्यमांशी बोलत होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता जनतेसमोर जावं, जेव्हा निवडणुका होतील तेव्हा जनता यांना कोण गदाधारी आहे हे दाखवून देईल, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

तुम्ही सोनिया गांधी यांच्या आशीर्वादाने सत्तेवर बसलात आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत तुम्ही हात मिळवणी केली. आमच्यासोबत युती होती म्हणून तुमचे 55 आमदार निवडून येऊ शकले. युती नसती तर तुमचे पंचवीस आमदार देखील निवडून आले नसते. शिवसेनेने आता त्यांचे चार खासदार तरी निवडून आणून दाखवावेत, असं महाजन म्हणालेत.

शिवसेनेकडून सध्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सुरू  आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि आताची शिवसेना कशी प्रबळ आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे, असंही ते म्हणालेत.

दरम्यान, फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा… असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

जगाने आणखी एक दिग्गज गमावला; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

‘घरी आई वडील आहेत की नाही…’; केतकी चितळेला उद्धव ठाकरेंनी सुनावलं

“मी काँग्रेसमध्ये उघड गेलो, तुमच्या सारखं पहाटे नाही गेलो” 

“तिला वेळेवर आवर घालायला हवं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही” 

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…