जळगाव | समीर वानखेडेंकडे 70 हजार शर्ट, 2 लाखांचे बूट आणि 15 कोटींची संपत्ती असल्याचा दावा नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता.
नवाब मलिकांच्या या आरोपावरुन आता भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मलिकांवर खोचक टीका केली आहे. नवाब मलिकांनी खालचे कपडे काढले नाहीत तर बरं, असं वक्तव्य महाजन यांनी केलंय.
नवाब मलिक हे बेछूट झाले आहेत. मनात येईल ते बोलत आहेत. आज बुट, सॉक्स, पँट पर्यंत येवून गेले. उद्या त्यांनी खालचे कपडेही काढले नाही तर बरं, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.
आई, बाप, बहीण काढून अतिशय खालच्या थराचं राजकारण नवाब मलिक करत असल्याचा घणाघात त्यांनी केलाय. त्याचवेळी मलिकांनी बोलताना तारतम्य बाळगावं, असा सल्लाही गिरीश महाजन यांनी दिला आहे.
लुई वेटॉनच्या बुटांची किंमत 2-2 लाख रुपये आहे. ते नेहमी बूट बदलत असतात. त्यांचं शर्टही 50 हजारापेक्षा अधिक किंमतीचं आहे, असं मलिकांनी सांगितलं होतं.
टी शर्टची किंमत 30 हजारापासून सुरू होते. ते जी ट्राऊजर परिधान करतात त्याची किंमत लाखो आहे. तर शर्टची किंमत 70 हजार रुपये आहे. त्याशिवाय ते 25 ते 30 लाखाचं घड्याळ वापरतात, असा दावा मलिक यांनी केला होता.
समीर वानखेडेंचं शर्ट 70 हजार रुपयांचं कसं? त्यांची पँट लाखाची, पट्टा दोन लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घडी 50 लाखांची, रोज नवीन कपडे घालतात. हे तर मोदींच्याही पुढे निघाले, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
एखादा अधिकारी एवढे महागडे कपडे घालत असेल तर तो प्रामाणिक कसा? असा सवालही नवाब मलिक यांनी केलाय.
दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या या आरोपांना वानखेडेंची बहिण यास्मिन वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
समीर वानखेडेच्या हातात असलेले घड्याळ त्यांना त्यांच्या आईने सतरा वर्षांपूर्वी गिफ्ट केलं होतं. तेच घड्याळ ते आजही वापरत असल्याचे यास्मिन वानखेडे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“रवी शास्त्री 24 तास नशेत असतात”; आरोपांनी भारतीय टीममध्ये मोठी खळबळ
मोदी सरकारकडून दिवाळी भेट! पेट्रोल आणि डिझेल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त
”The Lalit’ में राज छुपे है’; नवाब मलिकांकडून भाजपला खास दिवाळी शुभेच्छा
“चला आव्हान स्वीकारलं, आता होऊन जाऊ दे दूध का दूध और पानी का पानी”