गर्लफ्रेंड आलियानं रणबीरला दिलं असं गिफ्ट; पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

नवी दिल्ली | काही दिवसांपासून एक फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. तो फोटो आहे बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांचा. या फोटोत ते एका सायकलसोबत दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्याविषयी रिलेशनशिपच्या अनेक बातम्या येत आहे. यावरून असं वाटतय की, दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. या दोघांबद्दल सोशल मीडियातुन कोणती ना कोणतीतरी गोष्ट समोर येतच असते.

पण आता बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर एका नव्या ब्रँड सायकलबरोबर दिसत आहे. सोशल मीडिया तसेच रणबीर आणि आलिया यांच्या चाहत्यांच्या विविध पानांवरून अशी माहिती समोर आली आहे की, आलिया भट हिने रणबीर कपूर याला ही सायकल भेट दिली आहे, असं समजतंय.

Ranbir Kapoor

या गोष्टीची अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सध्या सोशल मीडियावर याच गोष्टीची लहर दिसून येत आहे. ही सायकल लाल रंगांची असून खूपच चांगली दिसत आहे.

रणबीर कपूर यांनी गडद निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला आहे. तसेच निळ्या रंगाची जीन्स घालून ते सायकल चालवताना दिसत आहे. ही सायकल खूपच महागडी दिसत आहे. त्या सायकलच्या किंमतीत तुमची एखादी छोटी-मोठी सहल पूर्ण होईल.

काही अहवालानुसार रणबीर कपूर यांनी घेतलेल्या या सायकलची किंमत तब्बल दीड लाख रुपये आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर रणबीर कपूर आणि आलिया भट हे आता ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे.

‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन दिसणार आहे. हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे तीन भाग बनवणार आहे, असंही बोललं जात आहे.

त्यातच आता बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्याविषयी काही अहवाल म्हणतात की, त्यांचे लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे. पण सध्या चालू असलेल्या कोरोना संकटामध्ये ही गोष्ट होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनासंदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर; डिसेंबर-जानेवारीत…

कंगनानं आता ‘त्या’ प्रकरणी दीपिकाला डिवचलं, दीपिकाचं नाव न घेता कंगना म्हणाली…

पायल घोषला ‘ते’ वक्तव्य महागात पडणार? कोर्टानं पायलच्या विरोधात दिला निर्णय

सुशांत प्रकरणी अभिनेता शेखर सुमन पुन्हा संतापला म्हणाला…

हाथरस प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती उघड, पीडितेची वहिनी म्हणून आलेली ती…