Video | गर्लफ्रेंड-बाॅयफ्रेंडचा भररस्त्यात राडा; डिलिव्हरी बॉय सोडवायला गेला अन् भलतंच घडलं…

भुवनेश्वर | प्रेम (Love) म्हणजे जगातील सर्वांत गोष्ट समजली जाते. व्यक्तीगत प्रेम सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होत असेल तर मोठी कसरत पहायला मिळते. प्रेमी युगलांचे अनेक किस्से पहायला सोशल मीडियावर (Video) पहायला मिळतात.

प्रेमी युगलांचे किस्से रस्त्यावर मनोरंजनाचे विषय ठरतात. अशीच एक घटना ओडिसाच्या भुवनेश्वरमध्ये पहायला मिळाली आहे. भररस्त्यात गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डमध्ये जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं.

रस्त्याच्या कडेला हा सर्व प्रकार घडला. रस्त्यावरून त्यावेळी अनेक वाहणं जाताना दिसली. गर्लफ्रेंड आणि बाॅयफ्रेंड दोघेही तावातावात भांडणं करत होती. दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं पहायला मिळालं.

गर्लफ्रेंड लाल अॅक्टिवावरून आली. तिने काळ्या अॅक्टिवावरून जाणाऱ्या बाॅयफ्रेंडला अडवलं आणि जाब विचारू लागली. शाब्दिक भांडणं पेटू लागली. रागारागात दोघांमध्ये शिविगाळ सुरू झाला. त्यावेळी आसपास अनेकजण दर्शक म्हणून दोघांची गम्मत पाहू लागली.

दोघांमध्ये हाणामारी देखील अधूनमधून सुरू होती. त्यावेळी त्याठिकाणी एक फूड डिलिव्हरी बाॅय आला. त्याने दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण दोघं मस्तकात राग धरून बसणारी ऐकतील तेव्हा ना!

दोघांमध्ये वाद सुरू असताना फूड डिलीव्हरी बाॅयला देखील शिव्या ऐकून घ्याव्या लागल्या. अखेर शिव्या ऐकून संताप अनावर झाल्यावर फू़ड डिलीव्हरी बाॅयने गर्लफ्रेंडला चांगलाच चोप दिला.

गर्लफ्रेंडने शिव्या दिल्यावर डिलीव्हरी बाॅयने समजून सांगण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, प्रकरण तापलं. मध्यस्ती करायला गेलेल्या डिलि्व्हरी बाॅयने दे दणा दण फटकवायला सुरूवात केली.

दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी तिघांना शांत केलं आणि सगळे आपापल्या वाटेने घरी गेले. दरम्यान, या प्रकरणात कोणतीही पोलिसात तक्रार दिलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण भर रस्त्यात मिटल्याचं पहायला मिळालं आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या- 

“गृहखात्यानं कठोर पावलं उचलावी अन्यथा…” 

फक्त परीक्षेसाठी अभ्यास करू नका, स्वत:चा विकासही त्यातून करा- नरेंद्र मोदी 

“अच्छे दिन हे एप्रिल फुलच, गेल्या 7 वर्षापासून लोक 15 लाख रुपयांची वाट बघतायेत” 

“रेल्वेत होणारा पाकिटमारीचा तपास ईडी, सीबीआयकडून व्हायचा बाकी” 

मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या दाव्याने खळबळ, म्हणाले…