नवी दिल्ली | सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओज आपल्याला चांगली शिकवण देवून जातात तर काही व्हिडीओज आपल्याला खळखळून हसवतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक खळखळून हसवणारा व्हिडीओ व्हयरल होत आहे.
प्रत्येक नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा असतो. विश्वासावरच सर्व नाती टिकून असतात. परंतु काही लोक या विश्वासाला तडा जाईल, अशी कृत्य करतात. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडचा विश्वास धुळीत मिळवताना दिसत आहे. परंतु त्याची गर्लफ्रेंड त्याला रंगेहाथ पकडते.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी घराचा दरवाजा जोरजोरात वाजवत आहे. घरात असणाऱ्या व्यक्तीला ती दरवाजा उघडण्यास सांगत आहे. मात्र,आतील व्यक्ती दरवाजा उघडत नाही.
तितक्यात घराच्या बाल्कनीतून एक व्यक्ती बाहेर येवून गॅलरीतून खाली डोकावताना दिसत आहे. हा व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत असतो. हा व्यक्ती खूप गोंधळलेला दिसत आहे. तेवढ्यात खाली उभी असणारी त्याची गर्लफ्रेंड दरवाजा तोडून आत जाते.
गर्लफ्रेंड घरामध्ये शिरताच बाल्कनीत उभा असणारा तिचा बॉयफ्रेंड एका तरुणीला घेवून बाल्कनीत येतो आणि तो तिला बाल्कनीतून खाली उतरवण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यावरून जाणारे काही लोक देखील त्या महिलेला खाली उतरण्यास मदत करतात.
ही तरुणी देखील अर्धनग्न अवस्थेत असते. यानंतर ही तरुणी रस्त्यावर असणाऱ्या एका बॉक्सखाली लपून बसते. परंतु गर्लफ्रेंडला याची चाहूल लागताच ती बाहेर येते आणि त्या तरुणीचा पाठलाग करते.
समोरच राहणारा एक व्यक्ती हे सर्व दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कोलंबिया मधील असल्याचं बोललं जातं आहे. नेटकरी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे गजाआड जाणार?
सिद्धार्थच्या मृत्यूमुळे कोलमडलेली शेहनाज ग्लुकोजवर? डिझायनरने केला खुलासा
सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लवकरच अडकणार लग्नबंधनात? शाहिरचा मोठा खुलासा
‘हेल्मेट घालूनच पहिला कंडोम विकत घेतला होता’; ‘या’ बड्या अभिनेत्याने शेअर केला मजेशीर किस्सा