नवी दिल्ली | शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया यांनी केली आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्वादी नेते होते. अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात त्यांनी उघड भूमिका घेतली होती. राम मंदिर आंदोलनाला त्यांनी नेतृत्व केल्याचं यापूर्वीही तोगडिया यांनी म्हटलं आहे.
राम मंदिर आंदोलनाचा पाया रचणाऱ्या आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस आणि महंत अवैधनाथ यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी यापूर्वी तोगडिया यांनी केली होती.
तोगडिया यांनी यापूर्वीही ही मागणी केली होती. राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
एक ऑन्कोलॉजिस्टच्या रूपात आपल्या सर्जरी कौशल्याने आणि संशोधन अभ्यास सोडल्याचाही गर्व असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. मला माझ्या प्रोफेशनमधून करोडो रूपये कमावता आले असते. पण मी त्यावेळी आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
तोगडिया यांनी आपल्या सोबत आंदोलनामध्ये अनेक मुख्य नेत्यांचं योगदानही बोलून दाखवलं. त्यामध्ये तत्कालीन विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल, महंत अवैद्यनाथ आणि रामनाथ परमहंस यांचीही आठवण त्यांनी काढली.
दरम्यान, कृषी कायद्याविरोधात आंदोलन करताना प्राण गमावणाऱ्या 700 शेतकऱ्यांच्या कुटूंबांना मोबदला देण्याचीही मागणी केली. शेतकऱ्यांना डावलत काही व्यापाऱ्यांना फायदा मिळवून देत असल्याचा आरोपही त्यांनी भाजप सरकारवर केला. त्यामुळेच या शेतकऱ्यांना मोबदला मिळाचा पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पोस्टाची बंपर योजना; बँकेपेक्षा मिळतोय अधिक परतावा
“…म्हणून शिवेंद्रराजे भोसले अध्यक्ष होऊ शकले नाहीत”
‘मेरे उतने बिग बूब्स नही जो मे…’; ‘त्या’ वक्तव्यामुळे नीना गुप्ता पुन्हा चर्चेत
महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर RBI ची मोठी कारवाई; ग्राहकांना झटका
आणखी स्वस्त झाली कोरोना चाचणी; जाणून घ्या काय आहेत दर!