Top news महाराष्ट्र मुंबई

परप्रांतीय गावी गेल्याने उपलब्ध रोजगार स्थानिकांना द्या; राज ठाकरेंची मागणी

मुंबई |  सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेक परप्रांतीय मजुर-कामगार आपापल्या गावी जात आहेत तर काही कामगार गाड्या चालू होण्याची वाट पाहत आहेत जेणेकरून त्यांना घरी जाता येईल. परंतू परप्रांतीय गावी गेल्याने जे रोजगार उपलब्ध झाले आहेत त्या ठिकाणी स्थानिकांना रोजगार द्या, अशी प्रमुख मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असूनदेखील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबातच्या उपाययोजना तसंच लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या शिथीलतेच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ही बैठक आताच संपली आहे. या बैठकीत राज ठाकरेंनी सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या. तसंच लॉकडाऊनवर चर्चा करत असताना काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.

ज्या कोणत्या ठिकाणी रोजगार उपलब्ध आहेत त्याची माहिती सरकारने महाराष्ट्रातील मुलामुलींना पोहचवावी, अशी सूचनाही सरकारला केल्याचं राज यांनी सांगितलं. तसंच आता गावी गेलेले परप्रांतीय मजूर ज्यावेळी परत येतील त्यावेळी त्यांची आरोग्य तपासणी झाल्याशिवाय त्यांना परत येऊ देऊ नये. तसंच त्यांची नोंदणी राज्य स्थलांतरित कायद्यानुसार करणं गरेजचे आहे कारण हीच ती  वेळ आहे की अशा वेळीच आपण ही नोंदणी करू शकतो. इतर वेळी ही सगळी प्रक्रिया आपल्याला सोपी जाणार नाही, अशीही सूचना त्यांनी सरकारला केली.

कोरोना आपल्यासोबत आणखी भरपूर दिवस राहणार आहे, हे बऱ्याच तज्ज्ञांनी सांगून झालंय. आपणही लॉकडाऊन खूप काळ ठेऊ शकत नाही. मग सरकार ज्यावेळी लॉकडाऊन शिथील करायचा विचार करेल त्यावेळी तुमचा प्लॅन काय असणार आहे? असा महत्त्वाचा सवाल त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत सरकारला विचारला. तसंच तुमचा एक्सिट प्लॅन अचानक लोकांना सांगून चालणार नाही. अगोदर काही गोष्टी क्लिअर असायला हव्यात, असंही ते म्हणाले.

आता मे महिना सुरू आहे. जूनमध्ये शाळा-कॉलेज सुरू होतात. सरकारचा याबद्दल काय विचार आहे. कारण ई-लर्निंग सगळयाच ठिकाणी करता येणार नाही. किंबहुना ग्रामीण भागात ते शक्य होणार नाही. मग अशा वेळी सरकारने यावर काय उपाययोजना केल्या आहेत? असा सवालही त्यांनी सरकारला केला.

महत्वाच्या बातम्या-

-लॉकडाऊन शिथील करायच्या वेळी तुमचा प्लॅन काय असणार? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

-मजुरांचे जथ्येच्या जथ्ये सरकारला अशोभणीय; लॉकडाऊनच्या सरकारी उपाययोजनांवर भुजबळ यांची नाराजी

-दारूच्या 65 कोटी महसुलाच्या बदल्यात 65 हजार कोरोना संक्रमण विकत घेणं परवडणारं नाही- संजय राऊत

-“…तर देशात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल”

-अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर 2 टक्के कोरोना कर लावा; देशातल्या विचारवंतांची मागणी

IMPIMP