अहमदनगर | ‘कोविड १९‘मुळे संशोधन थांबलेल्या पीएचडीच्या राज्यभरातील सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना तात्काळ प्रभावाने मुदतवाढ द्यावी अशी मागणी पत्राद्वारे डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी राज्यपाल यांच्या कडे केली आहे.
राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात राज्यातील विद्यापीठे व संशोधन संस्था या कोविड १९ मुळे १४ मार्च पासून बंद आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य मागे पडले आहे किंवा रखडले आहे.
या कालावधीत काही विद्यार्थ्यांची संशोधन कालखंडाची मुदत संपली आहे किंवा संपत आहे. कोविड मुळे जे महिने वाया गेले आहे किंवा अजुन जातील. याचा विचार करुन आपण राज्यातील पीएचडी व इतर अधिकचे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोविड मुळे खंडीत झालेला कालावधी त्यांना अधिकचा कालावधी आहे त्या मानतेच्या आधिन राहुन वाढु द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनेक विद्यार्थ्यांनी फोनव्दारे व प्रत्येकक्षात भेटुन मुदतवाढुन देण्याची मागणी केल्यानंतर डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी राज्यपालांना पत्र पाठवुन विनंती केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विद्यार्थी देशाचे भविष्य, कोणत्याही परिस्थितीत त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही- बच्चू कडू
-मंत्री आदित्य ठाकरेंकडून पर्यावरण खात्यासंबंधी मोठा बदल!
-महसूलमंत्री थोरात यांचा राज्यातल्या जनतेला करासंबंधी मोठा दिलासा
-येत्या ४८ तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
-छत्रपतींनी घालून दिलेला आदर्श सदैव प्रेरणा देत राहिल- अजित पवार