“माझ्या मतदानाचा अधिकारच संजय राऊतांना देऊन टाका; शंका घेण्याचा प्रश्नच राहणार नाही”

मुंबई | राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या 20 जून रोजी मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये ज्याप्रकारे दगाफटका झाला तो प्रकार विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार नाही, असा विश्वास महाविकास आघाडीतील नेते व्यक्त करत आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही आमदारांवर अविश्वास दर्शवला होता. ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली त्या आमदारांची लिस्ट आमच्याकडे आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यातच आता अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी संताप व्यक्त केला आहे.

संजय राऊत यांना माझ्यासोबत मतदान करताना पाठवा, अशी मागणी मी महाविकास आघाडीच्या सभेत करणार आहे. मी त्यांच्यासोबत मतदान करणार आहे. नाहीतर माझा मत करण्याचा अधिकार संजय राऊतांना देऊन टाका म्हणजे आमच्यावर शंका घेण्याचा प्रश्नच राहणार नाही, असं देवेंद्र भुयार म्हणाले आहेत.

मी लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीसोबत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मी महाविकास आघाडीसोबत राहणार आहे, असं आमदार देवेंद्र भुयार  यांनी स्पष्ट केलं आहे.

महाविकास आघाडी प्रचंड भ्रमात आहे. त्यांचा भ्रमाचा भोपळा राज्यसभेत फुटला आहे. दुसरा सुद्धा भोपळा फुटू शकतो, असा इशाराही देवेंद्र भुयार यांनी दिला. महाविकास आघाडीने कोणतेही गैरसमज न करता सर्वांना सोबत घेऊन अपक्ष असतील किंवा दुसऱ्या पक्षाचे आमदार असतील त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत, असं देवेंद्र भुयार म्हणाले आहेत.

मतदार संघातील प्रश्नांवर महाविकास आघाडीने मार्ग काढावा. मार्ग काढल्यास ते आमदार महाविकास आघाडीसोबत राहतील, असंही देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे राज्यसभेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर संजय राऊतांनी काही आमदारांची नावे घेत पराभवासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं. त्यातच आता संजय राऊतांनी आमचा अपक्ष आमदारांवर पुर्ण विश्वास आहे, असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते सर्वांचेचं आहेत. भुयारांवरही आमचा विश्वास आहे, असं संजय राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

अग्निपथ योजनेवरून नाना पटोलेंनी मोदी सरकारला सुनावलं, म्हणाले…

‘तुमच्यात दम असेल तर…’; उदयनराजेंचं अजित पवारांना खुलं आव्हान

“जे बोलतो ते CR करतोच, येणाऱ्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळा काढून त्यावर…”

“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”

दहावीच्या निकालात मुलींची बाजी; 97.96 टक्के मुली उत्तीर्ण