“मुंबई-पुण्यातील शेतकरी, मजुरांच्या मुलांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा”

पुणे | कोटा येथील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणलं हे चांगलं झालं. मात्र पुण्या-मुंबईत जे विद्यार्थी अडकले आहेत. त्या शेतकरी, मजुरांच्या मुलांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारकडे केली आहे.

कोटा येथील विद्यार्थ्यांना सरकारने बसेस पाठवून महाराष्ट्रात आणलं याबद्दल रविकांत तुपकर यांनी सरकारचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

मुंबई-पुण्यातील शेतकऱ्यांची मुलं लॉकडाऊनमुळे अडकून पडली आहेत. त्यांचे हाल होत आहेत. काही लोकांनी त्यांची मदत केली पण आता मदत करणाऱ्या लोकांनाही मर्यादा आहेत. उपासमार सुरू झाल्याने हे विद्यार्थी पायी गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे या मुलांना घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा, असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.

दरम्यान, सरकारने कोटा येथील विद्यार्थ्यांसाठी जो निर्णय घेतला तसाच मुंबई-पुण्यातील शेतकऱ्यांच्या पोरांबाबत घ्यावा, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-IFSC गुजरातला नेलं जात असताना फडणवीसांनी बोटभर चिट्ठी लिहूनही विरोध केला नाही- पृथ्वीराज चव्हाण

-दिलासादायक! रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला, आत्तापर्यंत 10,000 रुग्ण परतले घरी

-‘असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद’; अखिलेश यादव यांची मोदींवर टीका

-आता तुम्ही सत्ताधारी आहात नुसता शिमगा करु नका, प्रक्रिया पुर्ण करा -आशिष शेलार

-राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा; एकूण 361 पोलिसांना कोरोनाची लागण