“भावा माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे माझ्या बापालाच जाऊन विचार”

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूल आहे. नुकतंच शिवसेनेचे नेते आणि वनमंञी संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रसचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजपच्या नेत्या चिञा वाघ यांच्यात कलगीतुरा सुरु झाला आहे. आपण साहेबांच्या तालमीत तयार झाले असल्याने दिशाभूल करु नये, असं ट्विट करुन अमोल मिटकरी यांनी चिञा वाघ यांच्यावर टिका केली होती.

तसेच वाघाची डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती. पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळी सुद्धा हवेत कशी विरून जाते हे ही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते, अशी टिका अमोल मिटकरी यांनी केली होती. मिटकरींच्या याच टिकेला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मिटकरी भावा माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत? हे माझ्या बापालाच जाऊन विचार, अशा शब्दात चिञा वाघ यांनी अमोल मिटकरींच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

अमोल मिटकरी आत्ता आला आहे. तुला  पक्षाने आमदारकी दिली आहे, नीट काम कर. भावा माझ्या, तुला काय माहिती आहे. तुझा चांगला आवाज आहे, बोलत रहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहे, ते बापाला जाऊन विचार, साहेबांना विचार, ते सांगतील तुला. बाकी यावर फार बोलून याला महत्व द्यायची गरज नाही, अशा शब्दात चिञा वाघ यांनी मिटकरींना सुनावलं आहे.

चिञा वाघ यांचे काही दिवसांपूर्वी मॉर्फ केलेले फोटो व्हायरल झाले होते. याचबरोबर त्यांना धमक्या देणारे फोन सुद्दा येत हाते. याचविरोधात आज त्यांनी आयपीसी सेक्सन 67 अंतर्गत बिकेसी येथील सायबर क्राईम ऑफिसमध्ये गु.न्हा दाखल केला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी मिटकरींच्या टिकेला जोरदार उत्तर दिलं.

दरम्यान, पुजा चव्हाण मृ.त्यू प्रकरणात संजय राठोड यांनी मंञिपदाचा राजीनामा द्यावा, हा विषय चिञा वाघ यांनी आ.क्रमकपणे लावून धरला आहे. तसेच या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी व्हावी, असे त्यांचे मत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा”

“ज्यांच्या मनात करुणा त्यांना होणार नाही कोरोना”‘या’ भाजप खासदाराचं कोरोनामुळं निधन

पूजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी भाजपच्या ‘या’ नेत्यांवर गु.न्हा दाखल

कोरोना लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनच्या निशाण्यावर, केला फॉर्म्युला चोरण्याचा प्रयत्न