पणजी | देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. सध्या निवडणूक आयोगानं कोरोनाच्या कारणानं डिजीटल प्रचारावर भर दिला आहे.
निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण नियमांच्या अधिन राहून प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं प्रचार करत आहे. पाच पैकी चार राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. परिणामी सत्ता राखण्याच मोठं आव्हान भाजपसमोर आहे.
भाजपची सत्ता असणाऱ्या प्रत्येक राज्यात काॅंग्रेस नेते राहुल गांधी सध्या झंझावाती दौरा करत आहेत. घर ते घर प्रचार चालू असल्यानं या प्रचारादरम्यान राहुल गांधी वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत.
सध्या राहुल गांधी गोव्यात काॅंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थित आहेत. परिणामी गोव्यात सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. भाजपच्या हातून सत्ता खेचण्यासाठी विरोधक मोठी तयारी करत आहेत.
आपल्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी प्रचारसभेला संबोधित करताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. खरा सामना हा भाजप आणि काॅंग्रेसमध्ये आहे परिणामी मतदारांनी विचार करून मतदान करावं, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
राहुल गांधींच्या भाषणावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी फक्त पर्यटक म्हणून फिरायला आले आहेत. त्यांना विकास दिसत नाही, असं प्रमोद सावंत म्हणाले आहेत.
राहुल गांधींना गोव्यात विकास दिसत नसेल तर मला कळत नाही ते नक्की काय करत आहेत. तसंही राहुल गांधींना कोणी सिरीयस घेत नाही, अशा शेलक्या शब्दात सावंत यांनी टीका केली आहे.
दरम्यान, प्रमोद सावंत यांच्या टीकेनंतर गोव्यात भाजप आणि काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. गोव्यात सत्ता मिळवण्यासाठी सध्या या दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रयत्न चालू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मेट्रो ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशाचा जवानाने वाचवला जीव; घटनेचा थरारक व्हिडीओ CCTVमध्ये कैद!
“इस शॉट को क्या नाम दूं?”, राशिद खानने फिरवली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ
आमदार नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार
मोठी बातमी! लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
‘या’ महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपणार; ICMR ने दिली महत्वाची माहिती