पणजी | अवघ्ये देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरूवात झाली आहे. पहिल्यात फेरीतच अनेक दिग्गजांना धक्का बसत आहे.
गोव्यात सत्ताधारी भाजपचे प्रमुख चेहरा असणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आपल्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत. काॅंग्रेस उमेदवाराकडून सावंत यांना धक्का मिळण्याची शक्यता आहे.
गोव्यात भाजपला सत्ता राखण्यासाठी मोठी मेहनत करावी लागत आहे. काॅंग्रेसनं निकालाच्या एका दिवसाअगोदरच आपले दिग्गज नेते गोव्यात पाठवले आहेत.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. परिणामी हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, भाजप आणि काॅंग्रेसमध्ये गोव्याच्या सत्तेसाठी मोठी टक्कर पाहायला मिळत आहे. गतवेळीसारखी त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं”
गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर; ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
निकालाच्या 12 तास अगोदर गोव्यात हालचालींना वेग; काँग्रेसचे दिग्गज नेेते गोव्यात दाखल
“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही”
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’