माणसातला देवमाणूस! गर्भवती स्त्रीचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या डॉक्टरांचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. तर काही व्हिडीओ पाहून त्यांनी केलेल्या कामगिरीची कौतुक करावं तितकं कमी असतं. आपण पाहतो जगात माणूसकी नावाची गोष्ट आजकाल संपत चालली आहे.

सर्वांकडे पैसा आल्यामुळे जोतो आप-आपल्या जगात वावरत असतो. कोणालाच कोणाची पर्वा नसते. तसेच सध्या कोरोना रोगाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या झापाट्याने वाढ होत आहे. या कोरोना काळात फ्रन्ट लाईनवर काम करणारे पोलीस , डॉक्टर जीवाची पर्वा न करता रूग्णांवर उपचार करत आहेत.

तसेच या काळात डॉक्टर्स आपल्या सर्वांसाठी देवाप्रमाणेच आहेत. सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ माणूसकीचे एक जिवंत उदाहरण म्हणायला काहीचं हरकत नाहीय.

या व्हिडीओमध्ये एक गर्भवती महिला वेदनेनं तडफडत असल्याचं दिसत आहे. अँब्युलन्स मधून खाली उतरल्यानंतर हॉस्पिटलच्या आत नेण्यासाठी स्ट्रेचर न मिळाल्यानं, डॉक्टरांनी त्या महिलेची अवस्थापाहून तिला आपल्या दोन्ही हातांनी उचलून घेऊन आतामध्ये घेऊन गेल्याचं दिसतं आहे.

ही घटना हरियाणातील जीद जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमधील असल्याचं समजतं आहे. त्या डॉक्टरांचे नाव डॉ. रमेश पांचाल असं आहे. ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डेप्युटी सिव्हिल सर्जन आहेत. तसेच त्यांच्या या कृत्यामुळे माणूसकी आजूनही जीवंत असल्याचं दाखवून दिलं.

दरम्यान, त्या महिलेचं नाव सोनिया असून ती उत्तर प्रदेशमधील रहिवाशी आहे. तसेच ती आठ महिन्याची गर्भवती होती. परंतू तिच्यावर उपचार करण्याआधीच तिचा मृत्यू झाला असल्याचंही समजलं आहे.


महत्वाच्या बातम्या-

पती कामावर जाताच महिला प्रियकराला घरी बोलवायची अन्…,…

हनुमानाची जन्मकथा!, हनुमानाला मारुती का म्हणतात?, हनुमानाला…

पुणे पोलिसांकडून बड्या नगरसेविकेच्या मुलाला अटक, कारण ऐकून…

अभिनेत्री हिना खानला कोरोनाची लागण, काही दिवसांपूर्वीच झालं…

रेल्वे स्टेशन मास्टरने पत्नीची केली हत्या अन् स्वत:लाही…